पुणे : तरुणीशी मैत्रीचे संबंध असल्याच्या कारणातून कात्रजजवळील आंबेगाव परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (ता. २२) सायंकाळी घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरारी आहेत.
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?जावेद ख्वाजामियाँ पठाण (वय ३४, रा. ख्वाजानगर, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २५, रा. भोकर, जि. नांदेड) याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रौफ उस्मान शेख (वय ३५, सध्या रा. भूमकर चौक, नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जावेद पठाण याची आरोपी भुरकेच्या नात्यातील एका तरुणीशी ओळख झाली. त्यावर भुरके याने जावेद पठाण आणि तरुणीच्या मैत्रीस विरोध केला होता. जावेद हा सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आंबेगावमधील वॉशिंग सेंटरजवळ थांबला होता.
आनंदाची बातमी! 'पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास लवकरच १६० किमी वेगाने'; प्रवाशाच्या वेळेची हाेणार बचत..त्यावेळी भुरके आणि त्याच्या साथीदाराने तरुणीशी संबंध तोडण्यास सांगत वाद घातला. भुरके आणि त्याच्या मित्राने जावेदवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झाल्याने जावेदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला