99 टक्के लोक चुकीच्या पद्धतीने धुतात चिकन! लिंबू न वापरल्यास होऊ शकते मोठे नुकसान, कसे धुवावे जाणून घ्या
esakal December 26, 2025 01:45 PM

Chicken Cleaning Tips

चिकन कसे धुवावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

चिकन हा आपल्या दैनंदिन आहारातील मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा पदार्थ आहे. मात्र, चिकन वापरताना त्याची योग्य स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे असते. दुर्दैवाने, अनेक जण या बाबीकडे दुर्लक्ष करतात आणि विचार न करता चिकन शिजवतात.

Chicken Cleaning Tips

चिकनचा उग्र वास घालवायचाय?

केवळ पाण्याने चिकन धुणे पुरेसे नसते, कारण त्यातून वास पूर्णपणे जात नाही आणि स्वच्छताही होत नाही. स्वयंपाक करण्यापूर्वी चिकन नीट स्वच्छ करणे, त्याचा वास काढून टाकणे आणि सुरक्षितता राखणे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

Chicken Cleaning Tips

तज्ज्ञांचं काय मत?

काही तज्ज्ञांचे मत आहे, की कच्चे चिकन थेट पाण्याने धुतल्यास क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका वाढतो. त्यामुळे लिंबू किंवा मीठाच्या द्रावणाने चिकन घासून नंतर हलक्या पाण्याने धुणे अधिक फायदेशीर ठरते.

Chicken Cleaning Tips

1) हात स्वच्छ ठेवा

चिकन हाताळण्यापूर्वी आपले हात स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे. साबण किंवा डिटर्जंट वापरून किमान २० सेकंद हात नीट धुवा. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होतो.

Chicken Cleaning Tips

2) मिठाचा वापर करा

मिठाचे पाणी चिकनवरील घाण आणि दुर्गंध कमी करण्यास मदत करते. यासाठी एक लिटर कोमट पाण्यात दोन चमचे मीठ मिसळा आणि त्यात चिकन काही मिनिटे भिजत ठेवा.

Chicken Cleaning Tips

3) स्वच्छ पाण्याने धुवा

मिठाच्या द्रावणानंतर चिकन स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा. यामुळे अतिरिक्त मीठ निघून जाते आणि चिकन अधिक स्वच्छ होते.

Chicken Cleaning Tips

चिकन धुण्यासाठी लिंबू सर्वोत्तम का आहे?

लिंबामध्ये असलेला आंबटपणा आणि नैसर्गिक सुगंध कच्च्या चिकनचा उग्र वास प्रभावीपणे कमी करतो. त्यामुळे चिकन स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर खूप उपयुक्त ठरतो. शिवाय, लिंबू चिकन मॅरिनेट करण्यास मदत करतो, मांस अधिक रसदार बनवतो आणि मसाल्यांची चव खुलवतो.

Chicken Cleaning Tips

चिकन धुताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • चिकन धुताना साबण किंवा डिटर्जंट वापरू नका, कारण त्यातील रसायने आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.

  • खूप गरम पाण्याने चिकन धुणे टाळा, कारण त्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.

  • चिकन धुताना पाणी आजूबाजूला उडणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून स्वयंपाकघरात दूषितपणा पसरणार नाही.

World Most Expensive Vegetable

येथे क्लिक करा... जगातील सर्वात महागडी भाजी! किंमत तब्बल 85 हजार रुपये, कुठे मिळते?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.