Virat Kohli: सस्पेंस संपला! विराट कोहली 2027 विश्वचषक खेळणार की नाही? कोचचे थेट उत्तर
GH News December 26, 2025 02:09 PM

Virat Kohli ODI World Cup 2027: बुधवारी ,24 डिसेंबर रोजी विराट कोहलीने विजय हजारे करंडकात तुफान आणले. आंध्रप्रदेश संघाविरोधातील सामन्यात त्याने 131 धावांची खेळी खेळली. त्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीने 299 धावांचे लक्ष्य अवघ्या 38 व्या षटकातच गाठले. विराट हा गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात वनडे सीरीजमध्ये 2 शतक आणि एक अर्धशतकी खेळी खेळली.

जबरदस्त कामगिरी बजावत असतानाही विराटला काही वेळा विश्रांती देण्यात आल्याने वाद उफाळला होता. तर आता तो 2027 मधील ODI World Cup खेळणार की नाही, असा सवाल विचारल्या जात आहे. त्यावर विराटचा लहानपणीचा मित्र आणि कोच राजकुमार शर्मा याने ANI शी बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. कोच राजकुमार यांच्या मते विराट हा 2027 मधील विश्वचषकासाठी एकदम तंदुरुस्त आहे. तो खेळण्यासाठी तयार आहे.

विराट कोहली खेळेल 2027 वर्ल्ड कप!

वृत्त संस्था ANI शी बोलताना राजकुमार शर्मा यांनी सांगितले की, विराट हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. गेल्या काही सामन्यात त्याने सातत्य टिकवून ठेवले आहे. त्याने दीर्घकाळानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये उतरत चमकदार कामगिरी बजावली. भारतीय संघात सातत्यपूर्ण जोरदार कामगिरी बजावत त्याने त्याचे स्थान बळकट केले आहे. तो विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे.

दिल्लीसाठी त्याने 131 धावांची तुफान खेळी खेळली. कोहलीने लिस्ट-A मध्ये त्याच्या जीवनातील 58 वे शतक ठोकले. दिल्लीसाठी लिस्ट-A क्रिकेटमध्ये त्याचे हे 5 वे शतक आहे. त्याने या यादीत 16,000 धावा पूर्ण केल्या आहेत.लिस्ट-A क्रिकेटमध्ये विराटने 330 डावांमध्ये 16,130 धावा केल्या. विराट कोहली हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज 26 डिसेंबरमध्ये खेळेल. दिल्लीचा सामना आज गुजरातमध्ये होणार आहे. जयपुर येथील सवाई मान सिंह स्टेडियमवर हा सामना होत आहे. आज विराट पुन्हा शतकी खेळी खेळणार का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. तिकडे रोहित शर्मा ही जबरदस्त कामगिरी करत आहे. वैभव सूर्यवंशीची बॅट सुद्धा तळपली आहे. तर जुने खेळाडू सुद्धा स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलेच घाम गाळत असल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.