आता या विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेसचा पागार किती आहे, असे विचारले जात आहे. गेल्या अनेक दिवासंपासून पीआयए ही विमान वाहतूक कंपनी तोट्यात होती. या कंपनीवर बरेच कर्जही झाले होते. त्यामुळेच तिला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. लिलाव आयोजित करून ही कंपनी विकण्या आली.
तिची मालकी आता हबीब उद्योग समूहाकडे आली आहे. याच विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेच्या पगाराची रचना खूपच मजेदार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार पीआयए विमान वाहतूक कंपनीत नव्यानेच नोकरीला लागलेल्या एअर होस्टेसचा सुरुवातीचा पगार 80 ते 1 लाख 20 हजार पाकिस्तानी रुपये असतो.
नंतर हा पगार हळूहळू वाढत जातो. एअर होस्टेसला पाकिस्तानमध्ये इतर खर्चही मिळतो. यामध्ये हाऊसिंग अलाऊन्स, मेडिकल सुविधा, ट्रॅव्हल पर्क्स, इन्सुरन्स यांचा समावेश असतो. या सर्व भत्त्यांना एकत्र केल्यास एअर होस्टेसचे मासिक वेतन 5 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत जाते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता तिथे एका एअर होस्टेसला दिला जाणारा पगार खूपच जास्त आहे.
पाकिस्तानच्या अन्य खासगी विमान वाहतूक सेवांचा विचार करायचा झाल्यास सेरीन एअर’ (Serene Air) या विमान वाहतूक कंपनीत एअर होस्टेसला 70 हजार ते 1 लाख पाकिस्तानी रुपये पगार आहे. एअर ब्लू या कंपनीत हाच पगार 65,000 ते 95,000 पाकिस्तानी रुपये आहे.