न्हावरे, ता. २५ : ‘‘विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ बनण्याची पायाभरणी प्राथमिक व माध्यमिक शाळेतच झाली पाहिजे, त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत,’’ असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले. शिरूर तालुक्यातील करडे येथील भैरवनाथ विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
इयत्ता ६वी ते ८वी :
गोरे रोहन संतोष - विद्याधाम प्रशाला शिरूर, दाभाडे स्वराली नवनाथ - श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, बांदल वेदांत योगेश- श्री भैरवनाथ माध्यमिक करडे.
इयत्ता ९वी ते १२वी :
शेलार राजवीर शिवाजी - छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, वडगाव रासाई, पलांडे श्रेयश दिगंबर - संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखई, रसाळ गौरव देविदास - माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सणसवाडी.
दिव्यांग विद्यार्थी : ६वी ते ८वी
ग्रेसी नितीन थोरात - समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे,.
दिव्यांग विद्यार्थी गट : ९वी ते १२वी
पटणे पवन श्याम - न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर.
प्राथमिक शिक्षक गट :
दत्तात्रेय अनंतराव चिकटे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचाळेवस्ती केंद्र, टाकळी हाजी, दीपक दशरथ डोईफोडे - मंगलमूर्ती विद्यालय, रांजणगाव गणपती.
माध्यमिक शिक्षक गट : विजय म्हागू वरपे - श्री संभाजीराव विद्यालय जातेगाव बुद्रुक, दशरथ कृष्णा आलमे - श्री संभाजीराव विद्यालय जातेगाव बुद्रुक.
प्रयोगशाळा परिसर गट :
नानाभाऊ पांडुरंग थोरात - न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे, गणेश श्रीरंग मेमाणे - श्री दानोबा माध्यमिक विद्यालय धानोरे दरेकर वाडी.
प्रश्नमंजूषा स्पर्धा - माध्यमिक गट :
श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी, विद्याधाम प्रशाला शिरूर, रा. ग. पलांडे आश्रम शाळा, मुखई.
उच्च माध्यमिक संघ :
श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, विद्याधाम प्रशाला, शिरूर.
वक्तृत्व स्पर्धा - ६वी ते ८वी
प्रथम - श्रेया हरिदास गाडेकर- विद्याधाम प्रशाला, शिरूर
द्वितीय - शिवम सोमनाथ कोतवाल- जीवन विकास मंदिर, शिरूर
तृतीय - आनंदी अशोक टोणगे स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे.
वक्तृत्व स्पर्धा इयत्ता ९ वी ते १२वी
प्रथम - आर्या अविनाश आवारी - विद्याधाम प्रशाला शिरूर
द्वितीय - जान्हवी विजय पाटील - विद्या विकास मंदिर निमगाव महाळुंगे
तृतीय - साईरुद्र किरण गायकवाड - श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करडे.
आदी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सत्यवान पवार, विस्तार अधिकारी किसन खोडदे, मारुती कदम, राजेंद्र जगदाळे, नवनाथ जाधव, शिवाजी वाळके, ललिता जगदाळे, शीतल दिवटे, वर्षा जगदाळे, सारिका घुले, सुवर्णा लंघे आदी उपस्थित होते.