सोन्याचांदीचा दर : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच चांदीने दराचे (Silver Rate) सर्व विक्रम मोडित काढले आहेत. चांदीच्या भावात आजचा विक्रमी उच्चांक बघायला मिळाला आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचा आजचा भाव प्रति किलो 2, 50, 500 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान आजचा दर हा आतापर्यंतचा इतिहासातील सर्वोच्च भाव (Gold Silver Rate) असल्याचं चांदीचे व्यावसायिक सांगत आहेत.
जागतिक अनिश्चितता, सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी आणि औद्योगिक वापरात वाढ यामुळं चांदीने या वर्षी केवळ सोन्यालाच नव्हे तर शेअर बाजारालाही परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याने अंदाजे 70 ते 72 टक्के परतावा दिला आहे, तर चांदीच्या किमतीत 130 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अशातच आज चांदीच्या दराने सर्व विक्रम मोडित काढत्यामुळे नवा उच्चांक गाठला आहे.
सोने दर बातम्या : भारतातहे विक्रमी उच्चांक
दरम्यान, या वर्षी भारतात सोन्याच्या किमतीहे विक्रमी उच्चांक गाठत आहेत. शुक्रवारी, 26 डिसेंबर रोजी, 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमच्या किमतीत 58, 000 रुपयांची आणि 10 ग्रॅमच्या किमतीत 5,800 रुपयांची वाढ झाली. नाताळाच्या एक दिवसानंतर शुक्रवारी देशभरात सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. या काळात, हैदराबादमध्ये सोने सर्वात स्वस्त दराने म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 1.40,020 रुपये विकले गेले, तर चेन्नईमध्ये सर्वाधिक दराने प्रति 10 ग्रॅम1, 40, 620 दराने विकले गेले. सोन्याच्या किमतीत झालेली ही वाढ मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे. किंबहुनाएका अहवालात असेही दिसून आले आहे की किमतींमध्ये ही वाढ असूनही लोकांनी त्यांची खरेदी कमी केलेली नाही. याचा अर्थ असा की सराफा बाजारात अजूनही सोन्याची खरेदी सुरू आहे.
Gold Silver Rate: सोन्यापेक्षा चांदीच्या दरानं गुंतवणूकदारांना मोठा परतावा
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करणं कठीण होत आहे. सर्वसामान्य लोक सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. मात्र, काही लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे. दरम्यान, सोन्यापेक्षा चांदीच्या दरानं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.
सोन्याचांदीचा दर: पुढील वर्षी 20 टक्क्यां पर्यंत वाढ
दरम्यानतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की पुढच्या वर्षी चांदीच्या किंमतीत असा अपवादात्मक परतावा मिळण्याची शक्यता कमी असली तरी, मागणी वाढल्यामुळे आणि मर्यादित पुरवठ्यामुळे 2026 मध्ये आणखी 15 टक्के ते 20 टक्के वाढ शक्य आहे. गुंतवणूकदारांना अस्थिरता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यावसायिक आर्थिक सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.
आणखी वाचा