पाकिस्तानात म्हाताऱ्या बायकांना होतात मुलं, नेमका काय चमत्कार होतोय? जगात चर्चा!
GH News December 28, 2025 12:10 AM

Pakistan Womens : पाकिस्तान हा असा देश आहे, जो नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तर हा देश एका अजब कारणामुळे चर्चेत आला आहे. इथे एका भागात राहणाऱ्या महिला इतर महिलांच्या तुलनेत जास्त सुंदर असतात. विशेष म्हणजे यातील काही महिला तर वयाच्या 60 वर्षांपर्यंत आई होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

हुंजा प्रदेशाची विशेषता काय?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील गिलगिटस-बाल्टिस्तान या भागात हुंजा नावाचा पर्वतीय प्रदेश आहे. इथे खूप बर्फ पडतो. या भागात शुद्ध हवा असते. परिसरही खूप शांत असतो. हा प्रदेश समुद्रसपाटीपासून साधारण 2500 मीटर उंच असल्याचे सांगितले जाते. या भागात राहणाऱ्या लोकांना हुंजा समुदाय म्हणून ओळखले जाते.

हुंजा भागातील महिला शरीराने तंदुरुस्त

याच हुंजा लोकांचे आयुर्मान इतर लोकांच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगितले जाते. तसेच या लोकांना आजारही कमी होतात असा दावा केला जातो. इथं राहणाऱ्या महिला त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ओळखल्या जातात. त्या शरीरानेही खूप तंदुरुस्त असल्याचे बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्स आणि संशोधन लेखांमधील दाव्यानुसार हुंजा व्हॅलीमध्ये राहणाऱ्या महिला 70 ते 80 वर्षांपर्यंत जगतात, असे सांगितले जाते.

60 वर्षांपर्यंत होऊ शकतं मुल

सोबतच त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी असतात. स्थानिक रेकॉर्ड्स आणि तिथे भेट देणाऱ्या लोकांच्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या बऱ्याच महिला 60 वर्षाच्या होईपर्यंत प्रजननक्षम असतात. येथील महिला 60 ते 65 वर्षांच्या होईपर्यंत मूल जन्माला घालू शकतात असे सांगितले जाते.

हुंजा व्हॅलीमध्ये महिलांची विशेषता काय?

विचार करायचा झाल्यास सामान्य महिला 45 ते 55 वर्षांपर्यंतच मुलाला जन्म घालू शकतात. त्यानंतर गर्भधारणेची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. परंतु हुंजा व्हॅलीमध्ये महिला 60 ते 65 वर्षांपर्यंत मुल जन्माला घालू शकतात, असे सांगितले जाते. या महिलांची नेहमीच जगभरात चर्चा असते.

(हा लेख इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेला आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.