Government Loan: स्वत:चा बिझनेस सुरू करायचाय..? शून्य टक्के व्याज, सोपी प्रोसेस; सरकार देणार झटपट 5 लाखांपर्यंतचं कर्ज
Sarkarnama December 28, 2025 08:45 AM
Government Loan नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय

आजच्या काळात नोकरीपेक्षा तरुणांचा स्वतःचा छोटा मोठा असा व्यवसाय सुरू करण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे. केंद्र वा राज्य सरकारकडून युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहे.

Modi Government अतिशय महत्त्वपूर्ण योजना

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट लागते ती म्हणजे भांडवल. ही अडचण समजूनच सरकारने 2025 साली अतिशय महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.

अनेक तरुणांकडे अफाट बुध्दिमत्ता, कौशल्य आणि कल्पना असतात. मात्र, निधीच जवळ नसल्यानं त्यांना नोकरीच्या पाठीमागं धावं लागतं. आणि उद्योजक होण्याचं त्यांचं स्वप्नं अधुरंच राहतं. नोकरी मागणारी पिढी न घडवता नवे उद्योजक निर्माण या योजनेचा उद्देश आहे.

Government-Loan चार वर्षांच्या आत परतफेड

सरकार आता अशा होतकरु युवकांना ₹५ लाखांपर्यंत कर्ज हवं असेल, तर ते पूर्णत: व्याजमुक्त असणार आहे, यासाठी कोणतीही गॅरंटी किंवा जामीनाची आवश्यकता असणार नाही. पण हे कर्ज तुम्हांला कोणत्याही परिस्थितीत चार वर्षांच्या आत फेडावं लागणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय 21 ते 40 दरम्यान असणं बंधनकारक असणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता किमान आठवी उत्तीर्ण आहे.

Government-Loan Business कौशल्याधारित प्रशिक्षण

पण शिक्षणासोबतच कर्जदारानं एक कौशल्याधारित प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं लागतं. आणि विशेष म्हणजे ते मान्यताप्राप्त संस्थांमधून घेतलेलं असावं.

Government-Loan Business 10% रकमेचे अनुदान म्हणून माफ

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचा व्यवसाय यशस्वीरित्या दोन वर्षं सुरू ठेवला, तर कर्जाच्या 10% रकमेचे अनुदान म्हणून माफ केले जाणार आहे.

Government-Loan Business बँका....

कोणत्याही राष्ट्रीयकृत, ग्रामीण किंवा RBI मान्यताप्राप्त अशा बँकेत तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

Loan अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी सोपी असून तुम्हाला फक्त msme.up.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या अर्जाची संबंधित जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पडताळणी केली जाणार आहे. यानंतर तो संबंधित बँकेकडे पाठवण्यात येईल. एकदा हे कर्ज मंजूर झालं, की रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Municipal-Election-2026.jpg NEXT महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताय ? पण आयोगाचा 'हा'बदललेला नियम तुम्हांला माहितीय का? येथे क्लिक करा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.