Year Ender : 2025 मध्ये जगभरात फॉलो करण्यात आले हे फिटनेस ट्रेंड्स
Marathi December 28, 2025 06:26 PM

हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात तंदुरुस्त राहणे हे सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे. मात्र 2025 या वर्षात लोकांनी स्वत:च्या आरोग्याकडे अधिक बारकाईने लक्ष दिले आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी यावर्षी लोकांनी नवे तंत्र आणि ट्रेंडस् फॉलो केले आहेत. या ट्रेंड्समुळे अनेकांना उत्तम परिणाम सुद्धा मिळाले आहेत. आजच्या लेखात आपण 2025 मध्ये फिट राहण्यासाठी लोकांनी फॉलो केलेले ट्रेंड्स पाहूयात.

फिटनेस ट्रॅकर –

बिझी लाइफस्टाईलमध्ये डॉक्टरांकडे जाण्यास वेळ नसल्याने लोकांनी फिटनेस ट्रॅकर वापरण्यास पसंती दर्शवली. फिटनेस ट्रॅकरमुळे हृदयाची गती, दिवसभर बर्न झालेल्या कॅलरीज आणि चालण्याची पावले यांसारख्या गोष्टी ट्रॅक करणे सोपे गेले.

मानसिक आरोग्य –

2025 मध्ये लोकांनी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष दिले. यावर्षी योग, ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे या गोष्टी ट्रेंडमध्ये होत्या. या फिटनेस ट्रेंडमुळे मानसिक ताणतणावापासून आराम मिळाला.

हेही वाचा – Health Tips: आवळा खाताना काय काळजी घ्यावी ?

75 हार्ड चॅलेंज –

2025 मध्ये 75 Hard Challenge ने सर्वत्र धुमाकूळ घातला. लोकांनी सतत 75 दिवस कठोर नियमांचे पालन केले. यात दिवसातून दोन वेळा व्यायाम, भरपूर पाणी पिणे आणि चांगली पुस्तके वाचणे यांचा समावेश आहे.

डाएट –

2025 मध्ये अनेक डाएट व्हायरल झाले. यात इंटरमिटंट फास्टिंग, एआय डाएट आणि मेडिटेनेनियन डाएट यांसारख्या डाएटचा समावेश होता. लोकांनी हे डाएट फॉलो करून वेट लॉस केले.

आतड्यांचे आरोग्य –

यावर्षी आतड्यांचे आजार मोठ्या प्रमाणात जाणवल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध पदार्थ आणि पेये व्हायरल झाली. या पेयांमध्ये फायबरयुक्त पदार्थ, प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सचा समावेश होता.

सामर्थ्य प्रशिक्षण –

2025 मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश महिलांच्या दिनचर्येत झाला. हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला फायदेशीर आहे.

हेही वाचा – Health Tips: ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर थकवा, आळस जाणवतो? ‘या’ टिप्स करा फॉलो

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.