नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात 2025 च्या अखेरच्या महिन्यात देखील मोठी वाढ सुरु आहे. सोन्याचे दर वाढत आहेत, दुसरीकडे चांदीच्या दरात देखील वाढ सुरु आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात 17000 रुपयांची वाढ झाली. चार दिवसात 1 किलो चांदीच्या दरात 32000 रुपयांच वाढ झाली आहे.तर, आठवड्यात सोन्याच्या दरात 5700 रुपयांची वाढ झाली आहे
चांदीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे, त्यांना मोठा परतावा 2025 मध्ये मिळालेला आहे. चांदीच्या दरातील तेजी काही थांबण्याचं नाव घेत नाही. 2025 हे वर्ष संपण्यास तीन दिवसांचा कालावधी बाकी असून या दिवसात देखील चांदीचे दर वाढू शकतात. जागतिक संकेत आणि औद्योगिक मागणी वाढल्यानं चांदीचे दर सातत्यानं वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 19 डिसेंबरला चांदीच्या वायद्याचा दर 208439 रुपये होता. शुक्रवारी चांदीचे दर 240935 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चार दिवसात चांदीचा दर 32496 रुपयांनी महागली आहे.
एकीकडे चांदीचे दर वाढत असतानाच दुसरीकडे सोन्याचे दर देखील वाढत आहेत. मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 5744 रुपयांनी वाढले आहेत. 19 डिसेंबरला सोन्याचे दर 134196 रुपये होते, शुक्रवारी सोन्याचा दर 139940 रुपयांवर पोहोचले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजनंतर देशांतर्गत बाजारातील सोन्याचे दर किती रुपयांवर आहेत, ते जाणून घेऊयात.19 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 131779 रुपयांवर होता. शुक्रवारी 26 डिसेंबरला सोन्याचा दर 137956 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर 6177 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 134650 रुपयांवर, 20 कॅरेट सोन्याचा दर 122780 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 111740 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 88980 रुपयांवर आहे.
देशांतर्गत सराफा बाजारात 19 डिसेंबरला चांदीचा दर 200067 रुपये किलो होता. 26 डिसेंबरला चांदीचा दर 228107 रुपये किलोवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदीचा दर सराफा बाजारात 28040 रुपयांनी महागला आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी केलेले दर देशभर सारखे असतात. मात्र, प्रत्येक शहरात प्रत्यक्ष दुकानात सोन्याचे आणि चांदीचे दर अधिक असतात. सोने आणि चांदी खरेदी करताना जीएसटी चार्चेस आणि मेकिंग चार्जेस द्यावे लागतात.
सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची अनेक कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदीचे दर देखील वाढत आहेत, त्याचा परिणाम भारतावर पाहायला मिळतोय. अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यानं आणि अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याज दर कपात केली जाण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून पुन्हा सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत.
आणखी वाचा