सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान 2020 मध्ये झालेल्या संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर सलमानसोबत यामध्ये गोविंदा आणि चित्रांगदा सिंह यांच्याही भूमिका आहेत. एप्रिल 2026 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळालंय, त्याविषयी जाणून घेऊयात..
सलमान खान या चित्रपटात कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबूची मुख्य भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी सलमानने त्याच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान एका प्रोजेक्टसाठी 100 ते 150 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारतो. यामध्ये अनेकदा चित्रपटाच्या प्रॉफीटमधील काही भागाचाही समावेश असतो. परंतु सलमानच्या फी बद्दल अधिकृत खुलासा अद्याप झाला नाही. काही रिपोर्ट्सनुसार, सलमानला 110 कोटी रुपयांचा चेक मिळाला आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातून अभिनेता गोविंदा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु या चित्रपटासाठी गोविंदाला फारसं मानधन मिळालेलं नाही. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा प्रत्येक प्रोजेक्टसाठी पाच ते सहा कोटी रुपये फी घेतो. परंतु ‘बॅटल ऑफ गलवान’साठी त्याला दोन कोटी रुपये अधिक मानधन मिळाल्याचं समजतंय. म्हणजेच त्याची एकूण फी 8 कोटी रुपये इतकी झाली.
View this post on Instagram
सलमानच्या या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहे. एका प्रोजेक्टसाठी ती सहसा एक कोटी रुपये मानधन स्वीकारते. परंतु ‘बॅटल ऑफ गलवान’साठी तिला दोन कोटी रुपये मिळाल्याचं कळतंय. निर्मात्यांकडून अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ‘हसीना’, ‘जंजीर’ आणि ‘अ सुटेबल बॉय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अंकुर भाटियासुद्धा ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला जवळपास दीड कोटी रुपये मानधन मिळणार असल्याचं कळतंय.
अभिलाष चौधरीने याआधी सलमान खानसोबत ‘दबंग 3’ आणि ‘सिकंदर’मध्ये काम केलं होतं. आता पुन्हा एकदा तो भाईजानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटासाठी त्याला 50 लाख रुपये मानधन मिळालं आहे. रॅपर यो यो हनी सिंहच्या ‘मिलियनेयर’ या गाण्याच्या व्हिडीओसाठी ओळखली जाणारी हीरा सोहल ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी तिला एक कोटी रुपये मानधन मिळाल्याचं समजतंय.