मुनीर विरोधात बोलण भोवलं, माजी पाकिस्तानी आर्मी ऑफिसरवर कठोर कारवाई, थेट…
GH News December 28, 2025 10:10 PM

पाकिस्तान सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर विरोधात बोलल्यामुळे एका अधिकाऱ्याला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान सरकारने निवृत्त मेजर आदिल रझा यांना अनुसूची 4 चे दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. यानंतर आता आदिल रझा यांनी ही कारवाई माझ्याविरुद्धचे आंतरराष्ट्रीय दडपशाहीचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आदिल रझा हे पाकिस्तानी सरकारचे टीकाकार आहेत, त्यांनी अनेकदा पाकिस्तानी सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. आदिल रझा म्हणाले की, ‘अज्ञात व्यक्तींनी अलीकडेच लंडनमधील माझ्या घरात घुसून घराची तोडफोड केली. त्यावेळी घरी कोणीही नव्हते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे.

पुढे बोलताना आदिल रझा यांनी म्हटले की, ‘मी आणि माझे कुटुंब आता सुरक्षित आहोत. पण केंब्रिजमध्ये इम्रान खान यांचे जवळचे सहकारी शहजाद अकबर यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर लगेचच माझ्या घरावर हल्ला झाला. ही घटना गंभीर चिंतेची बाब आहे. हे कृत्य युकेमध्ये पाकिस्तानी सरकारच्या टीकाकार आणि असंतुष्टांविरुद्ध दडपशाही आहे. त्यामुळे आता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.

सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे शिक्षा

पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईवर बोलताना आदिल रझा यांनी म्हटले कीस, ‘पाकिस्तानी सरकार मला युकेमधून मायदेशी नेण्यात अपयशी ठरले आहे, त्यानंतर आता माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले आणि मला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. सरकारचा हा निर्णय कोणत्याही गुन्ह्यावर आधारित नाही, ही शिक्षा पत्रकारितेसाठी आणि राजवटीविरुद्ध बोलण्यासाठी देण्यात आली आहे.

माझे तोंड कुणीही बंद करू शकत नाही – आदिल रझा

आदिल रझा यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना म्हटले की, ही कारवाई पाकिस्तानच्या लष्करी राजवटीकडून सुरू असलेल्या दडपशाही मोहिमेचा एक भाग आहे. मी या कारवाईचा सन्मान करतो. मात्र ही कारवाई माझा आवाज बंद करू शकत नाही. मी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामान्य लोकांच्या समस्यांसाठी आवाज उठवत राहणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.