डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उफाळलेली कार्यकर्त्यांची नाराजी शांत करण्यासाठी अखेर भाजप नेतृत्व प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट हस्तक्षेप केल्याचे चित्र दिसून आले. “आहे त्या जागांवर समाधान माना आणि महायुतीतच निवडणूक लढा” हा स्पष्ट संदेश देत वरिष्ठ पातळीवर झालेल्या युती निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जागावाटपावर असमाधान असले तरी युतीतून बाहेर पडण्याचा पर्याय नसल्याचे सूचक संकेत या सूचनेतून देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
युतीचा निर्णय हा स्थानिक दबावातून नव्हे, तर वरिष्ठ स्तरावर ठरलेला असून त्याचा राजकीय लाभ महायुतीला होईल, असा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे केडीएमसीच्या रणांगणात अस्वस्थ कार्यकर्त्यांना आवर घालत संघटनात्मक शिस्त आणि युतीधर्म पाळण्यावर भर देण्यात आल्याचे स्पष्ट होते. या एंट्रीमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अद्याप संपलेला नसला, तरी निर्णयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरलीकल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या जागावाटपावरून महायुतीत तणाव वाढला आहे. विशेषतः कल्याण पूर्वेत भाजपाला अवघ्या सात जागा आणि पश्चिमेत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या नाराजीतूनच कल्याण पूर्वेतील आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन कालपासून सुरू होते.
या घडामोडींची गंभीर दखल घेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी तातडीने हस्तक्षेप केला. डोंबिवलीतील त्यांच्या निवासस्थानी रविवारी कल्याण पूर्व व पश्चिमेतील विद्यमान आमदार, माजी आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांची नाराजी समजून घेत ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
BMC Election: महायुतीत धुसफूस! नाराज इच्छुकांचा महाविकास आघाडीकडे ओढा; कल्याण–डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेगबैठकीदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, “आहे त्या जागांवर समाधान माना आणि महायुतीतच निवडणूक लढा,” अशी स्पष्ट सूचना दिली. युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला असून, त्याचा राजकीय लाभ महायुतीला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या भावना रास्त आहेत. आम्ही त्यांची नाराजी वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवली आहे. पक्षहित आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या दोन्हींचा समतोल राखत योग्य तो मार्ग काढला गेला आहे. युतीत निवडणुक लढायची असून हे वरिष्ठाचे आदेश आहेत. आता त्यानुसार लढावे लागेल. आहे त्या जागांवर समाधान मानावे लागेल असे त्या म्हणाल्या.
Thane Politics: जागावाटपात भाजपात अस्वस्थतता! कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा स्वबळाचा सूरजागावाटपाचा फॉर्म्युला भाजपासाठी अन्यायकारक असल्याचा आरोप केला जात आहे. केडीएमसीत भाजपाची संघटनात्मक ताकद मोठी असतानाही कमी जागा देऊन पक्षाची कोंडी करण्यात आली, असा सूर उमटत आहे. आता यावर आगामी निवडणुकीत महायुतीची रणनीती कशी आखली जाते हे पहावे लागेल.