माले, ता. २८ ः पिंपरी (ता. मुळशी) येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ गणपत ढमाले पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. पंचक्रोशीतील विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, पत्नी, मुलगे, मुलगी असा परिवार आहे. मुंबई येथील डबेवाले संघटनेचे रघुनाथ ढमाले हे त्यांचे बंधू होत. तर, राजेश ढमाले व संतोष ढमाले हे त्यांचे पुत्र होत.