गुनाट. ता. २८ : मोटेवाडी (ता. शिरूर) येथे विजेच्या धक्क्याने भरत महादेव उघडे (वय २९) या तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत बाबासाहेब महादेव उघडे यांनी या संदर्भात शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. भरत उघडे ( मूळ गाव पाचवड, ता. परांडा, जि. धाराशीव हे मोलमजुरीच्या निमित्ताने मोटेवाडी येथे इलेक्ट्रिकल काम करत असताना शनिवारी (ता. २७) दुपारी साडेबारा वाजता त्यांना विजेचा धक्का बसला. त्यास तातडीने शिरूर येथे खासगी दवाखान्यात दाखल असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यासंदर्भात पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.