KDMC Water Shortage : कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट, १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद
Saam TV December 29, 2025 06:45 AM
  • ३० डिसेंबरला १२ तास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाणी बंद

  • पाइपलाईन टॅपिंग पॉईंटवरील गळती दुरुस्ती करण्याच्या कामासाठी पाणी बंद

  • सकाळी ९ ते रात्री ९पाणी पुरवठा बंद राहणार

  • नागरिकांना पाणीसाठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली

कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी. महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मंगळवार दि ३० डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आवश्यक दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सकाळी ९.०० ते रात्री ९.०० असा एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 'महिलो उद्वहन' केंद्रामार्फत उल्हास नदीतून पाणी उचलून १५० द.ल.लि. क्षमतेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागाला पाणीपुरवठा केला जातो.

Mangesh Kalokhe : खोपोलीतील माजी नगरसेवकच्या हत्याकांडातील ९ आरोपी गजाआड; दोघे फरार

केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या, उंच जलकुंभाच्या इनलेट मुख्य जलवाहिनीस जोडलेल्या टॅपिंग ठिकाणी पाणी गळती होत आहे. ही गळती थांबवण्यासाठी संबंधित पाईप काढून आवश्यक दुरुस्ती करून पुन्हा बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Shocking : नवऱ्याने दुसरं लग्न केलं, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेने आयुष्य संपवलं, शेवटच्या पत्रात धक्कादायक कारण

या कामासाठी केडीएसीने येत्या मंगळवारी म्हणजेच दि ३० डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत तब्बल १२ तास हा पाणी पुरवठा बंद असणार आहे. तरी या कालावधीत नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.