Jalgaon Politics: ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना आमदारकी; नाराज इच्छुकांसाठी भाजपची नवी ऑफर
Saam TV December 29, 2025 11:45 AM
  • भाजपकडून नाराज इच्छुकांसाठी नवी राजकीय ऑफर

  • तिकीट कापलेल्या इच्छुकांना आमदारकी देण्याचा प्रस्ताव

  • बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची नवी रणनिती

जळगावमध्ये भाजप-शिवसेना युतीचे फिक्स झालीय.तर राष्ट्रवादीबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. दरम्यान महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरले जाताहेत. भाजपकडील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी भाजपकडून पात्रता नियम खूप कडक लावण्यात आलेत. यात असल्याने अनेकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होण्याची देखील शक्यता आहे. त्याच भीतीतून भाजपच्या संकटमोचकांनी नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी नवी ऑफर आणलीय. ज्यांचे तिकीट कालं जाणार त्यांना आमदारकीमिळणार आहे. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी ही ऑफर सांगितलीय. महापालिका निवडणुकीत ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना पुढे बढती दिली जाईल. नगरसेवक नाही, तर थेट आमदारकी तुम्हाला मिळू शकते, अशी ऑफर देत महाजनांनी इच्छुकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलाय. जर तिकीट कापले जाणार आहे त्यांचा पुढे आमदारकी म्हणजे विधानपरिषदेवर, शिक्षक पदवीधर मतदारसंघ, विविध महामंडळावर तुमचा विचार केला जाणार, यामुळे नाराज होऊ नका अशी समजूत गिरीश महाजन यांनी काढलीय.

Solapur Politics: सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच पक्षाला ठोकला रामराम

निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने जळगाव शहरात तीन वेगवेगळे सर्व्हेक्षण केलेत. या सर्व्हेक्षणाच्या आधारे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. जे निष्ठावंत आहेत, जे सक्षम आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांचा विचार निश्चित केला जाणार आहे. खासदार स्मिता वाघ यांचे तिकीट काही वर्षांपूर्वी कापले गेले होते. मात्र नंतर त्यांना पुन्हा संधी दिली गेली. यामुळे ज्यांचे तिकीट आता कापले जाईल, त्यांनी नाराज होऊ नये. असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.