why viral beauty trends are dangerous: सोशल मीडियावर दररोज नवनवे ब्युटी ट्रेंड्स व्हायरल होत असून, अनेक तरुण-तरुणी तसेच महिलांमध्ये हे ट्रेंड फॉलो करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसते. घरगुती उपाय, केमिकल पील्स, डाय फेसपॅक, स्कीन लाइटनिंग हॅक्स, तसेच कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरले जाणारे कॉस्मेटिक उत्पादने यामुळे त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम, युट्यूब व रिल्स प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर्स वेगवेगळे प्रयोग दाखवत आहेत. मात्र, हे सल्ले सर्वांसाठी सुरक्षित असतीलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. अशा परिस्थितीत एकाच ट्रेंडचा सर्वांवर समान परिणाम होईल, हा गैरसमज धोकादायक ठरू शकतो.
Cold And Flu Myth: ओल्या केसांनी थंडीत बाहेर गेल्यास सर्दी होते का? वाचा डॉक्टरांचे मतनैसर्गिक संरक्षण थर नष्ट होण्याचा धोका
तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या ब्युटी ट्रेंड्समुळे त्वचेवर पुरळ, जळजळ, अॅलर्जी, पिग्मेंटेशन, सुरकुत्या तसेच कायमस्वरूपी डाग पडण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः लिंबू, बेकिंग सोडा, टूथपेस्ट, जास्त प्रमाणातील केमिकल अॅसिड्स यांचा चेहऱ्यावर वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक संरक्षण थर नष्ट होण्याचा धोका असतो. सोशल मीडियावरील ‘रिझल्ट्स इन सेवन डेज’ किंवा ‘इन्स्टंट ग्लो’ यासारख्या दाव्यांवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे.
त्वचेची निगा ही सातत्याने, योग्य पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतली पाहिजे. कोणतेही नवीन प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आणि त्वचेच्या समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फॉलोअर्स किंवा व्ह्यूजच्या आकड्यांपेक्षा वैज्ञानिक व वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य द्यावे. सुंदर दिसण्याच्या नादात त्वचेचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे हीच खरी सौंदर्याची गुरुकिल्ली आहे.
त्वचेचे मुख्यतः तीन प्रकार असतात. कोरडी, तेलकट व मिश्र त्वचा. त्यानुसार, डॉक्टरांच्या सल्ल्याने सौंदर्य प्रसाधने वापरावी. बहुतांश क्रिममध्ये हायड्रोजन व स्टेरॉईड असतात. त्याने मुरूम, त्वचा पातळ होणे, चेहऱ्यावर केस सुद्धा येतात. कधीकधी त्वचा गोरी पडण्याऐवजी काळी होते. सिरमसुद्धा कधी कोणते कसे वापरायचे ते महत्त्वाचे असते, अन्यथा त्यानेसुद्धा नुकसान होऊ शकते.
-डॉ. वैशाली शिरभाते, त्वचारोगतज्ज्ञ.