मंगळवेढा : जकराया शुगर या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी आज पालकमंत्री जयकुमार गोरे,आ.सचिन कल्याणशेट्टी,महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोलापूर येथील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये संपन्न झाला असून यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे,भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष सुदर्शन यादव, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश अवताडे आदी उपस्थित होते.
सचिन जाधव हे मूळचे मंगळवेढ्याचे असून त्यांनी साखर कारखानदारी मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकाराया शुगर या खाजगी साखर कारखानदारीतून आपला प्रवास सुरू केला कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी भीमा पट्ट्यातील अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न मार्गी लावला.साखर आयुक्तालयाने राज्यातील साखर क्षेत्रासाठी ‘व्हीजन 2047′ हा धोरणात्मक 'रोडमॅप' पुढील दोन दशकांत महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला शाश्वत वाढ, नवोपक्रम आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देण्यासाठी हा 'रोडमॅप' तयार दस्तऐवज तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीत समावेश होता शिवाय सीबीजी प्रकल्पात एका दिवसात " रेकॉर्ड ब्रेक" सतरा हजार पाचशे किलो गॅस निर्मिती करून प्रतिदिन देशातील सर्वाधिक गॅस निर्मिती करणारा प्रकल्प म्हणून नावलौकिक प्राप्त केला.
Solapur Politics: साेलापुरात शिवसेनेची राष्ट्रवादीशी युती! ‘फिफ्टी-फिफ्टी’चा ठरला फॉर्म्युला, बोलणी फिसकट अन्..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सचिन जाधव यांच्या अनेक उपक्रमाचे कौतुक केले.त्याच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व मंगळवेढा तालुक्यात नवी राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात
वडिलांनी खत विक्री माध्यमातून मोठा विश्वासान संपादन केला. मंगळवेढ्यातून शून्यातून पुढे जाऊन कारखानदार होण्याचे स्वप्न बाळगून ते पूर्ण केले. छोटी व्यक्ती मोठे स्वप्न बघते आणि ते कारखानदारीतून पूर्ण करून दाखवते हे मोहोळ तालुक्याला दाखवून दिले.जकाराया कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा मोठा विश्वास संपादन केला.
शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष भाजप