राज्यात अपघातांची मालिका सुरुच
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात
या अपघातात चार जणांचा मृत्यू
मयूर राणे, साम टीव्हीराज्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना ताजी असताना मुंबईतही भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईत भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. मुंबईच्या भांडुप रेल्वे स्थानकाजवळ भरधाव बसने अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यूमुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्टेशन बस डेपो जवळ बस खाली येऊन चार जणांचा मृत्यू झाला. कामावरून घरी जाणाऱ्या लोकांच्या वर्दळीदरम्यान हा अपघात झाला. भांडूप पश्चिम भागात बेस्ट बसने चार-पाच जणांना चिरडले. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?भांडूप पश्चिम भागात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अपघातानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने अपघातात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी पांगवली.
Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी कुर्ल्यातील पूर्व भागातही बेस्ट बसच्या भीषण अपघाताची घटना घडली होती. या बेस्ट बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सोमवारी भांडुपमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईतील वाढत्या बेस्ट बस अपघात चिंतेचा विषय ठरत आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातजालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. जालन्यात समृद्धी महामार्गावरील जामवाडी जवळ ही घटना घडली. ट्रकला अपघात झाल्याने ट्रकमधील कुटुंब खाली उतरले असता पाठीमागून येणाऱ्या ॲम्बुलन्सने कुटुंबास चिरडल्याची घटना घडली. एकच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.