मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीये
पहिल्या यादीत ८७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे
मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराला काँग्रेसकडून अधिकृत सुरुवात झालीये
काँग्रेसच्या पुढील यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत ८७ जणांच्या नावांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या साथीने लढणाऱ्या काँग्रेसने आमदार-खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचाही समावेश यादीत पाहायला मिळत आहे. राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आमदार अस्लम शेख यांच्या कुटुंबातील सदस्य यंदा रिंगणात पाहायला मिळेल.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन एकत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जागावाटप देखील निश्चित झालं आहे. वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस उर्वरित जागांवर निवडणूक लढणार आहे.
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्रीया निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसने एकूण ८७ जणांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीनंतर काँग्रेस दुसरी यादी कधी जाहीर करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त; उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज, RPI कार्यकर्तेही भडकले वर्षा गायकवाड नाराज आहेत का?काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, आम्हाला आनंद आहे की, आमची युती वंचित बहुजन आघाडीबरोबर झाली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. जाती-धर्माचे वातावरण निर्माण करू नये ही अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाची झालेली आघाडी ही ऐतिहासिक आहे. ही निवडणूक मुंबईला दिशा देणारी ठरेल'.