इचलकरंजी : प्रभाग १३ मध्ये शहराचा बहुतांशी मध्यवर्ती परिसर येतो. वित्तीय संस्था, व्यापारी संकुल, वाणिज्य परिसर, उद्याने, स्टेडियम आदी वर्दळीचा परिसर येतो. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. अंतर्गत रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे.
रुग्णालयांचा परिसर असलेल्या कागवाडे मळा परिसरातील रस्त्यावरून जाताना अक्षरश: खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. अशा या प्रभागात दिग्गज मंडळी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. दोन्हीकडून प्रतिष्ठा पणाला लावली जाणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे महायुती व शिव - शाहू विकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’ पाहावयास मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
- पंडित कोंडेकर
नेहमी वर्दळ असणाऱ्या या परिसरात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. उद्याने, मैदाने, शासकीय कार्यालये यांचा प्रामुख्याने समावेश असणारा हा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागाच्या महापालिकेतील नेतृत्वाला विशेष महत्त्व येणार आहे.
त्यासाठी दोन्ही बाजूने प्रतिष्ठा पणाला लावण्यात जराही कसूर ठेवली जाणार नाही, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. अलीकडे या प्रभागात जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदाई केल्याने धुळीचा त्रास सर्वच घटकांना बसत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
Dhule Municipal Election : ‘विरोधकमुक्त धुळे’च्या दिशेने भाजप; इच्छुकांची जम्बो लिस्ट ठरतेय अडसरमहायुतीकडून प्रभावी चेहरे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. काही भागांत जातीचा फॅक्टर प्रभावी ठरणार आहे. त्यादृष्टीने उमेदवारी देताना दोन्हींकडून विचार करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असलेला हा प्रभाग असल्यामुळे येथे पक्ष आणि व्यक्ती अशा दोन्ही बाबी तपासूनच मतदान केले जात असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. विजयी करण्यापेक्षा पाडापाडीच्या राजकारणासाठी हा परिसर प्रसिध्द आहे.
धक्कादायक निकालाची परंपरा यावेळीही या प्रभागात दिसणार, अशी चर्चा आतापासूनच सुरू आहे. त्यामुळे नेतेमंडळीदेखील उमेदवारी देताना विशेष दक्ष राहिली आहेत. बंडखोरीची मोठी डोकेदुखी भाजपसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपला मानणारा मतदार वर्ग या प्रभागात अधिक आहे. त्यामुळे गेल्या नगरपालिका निवडणुकीत कमळ चिन्ह नसल्यामुळे वेगळा निकाल पाहावयास मिळाला होता. विरोधी शिव-शाहू विकास आघाडीने या प्रभागातून जोरदार तयारी केली. पॅनेल अधिक मजबूत करण्यावर त्यांच्याकडून सध्या तरी भर देण्यात येत आहे.
पारंपरिक लढत या दृष्टिकोनातूनही या प्रभागातील लढतीकडे पाहिले जात आहे. भाजपसाठी या प्रभागातील लढत विशेष प्रतिष्ठेची असणार आहे; तर दुसरीकडे शिव-शाहू विकास आघाडीने सूक्ष्म नियोजन केले आहे.
पॅनेलमधील इच्छुकांचा घरटी संपर्क ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. प्रचारात हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या संभाव्य उमेदवारांनीही प्रभागात आतापासूनच मोठी हवा निर्माण केली आहे. एकूणच पुढील राजकीय घडामोडींचा अंदाज पाहता, या प्रभागात ‘काँटे की टक्कर’ पाहावयास मिळू शकते.
लोकसंख्यापुरुष मतदार = ८०६९
महिला मतदार = ८०८९
एकूण मतदार = १६१९६
एकूण लोकसंख्या - १६४६३
अनुसूचित जाती लोकसंख्या
अनुसूचित जमाती लोकसंख्या
आरक्षण असे...अ - ओबीसी महिला
ब - खुला महिला
क - खुला
ड - खुला
विकासाचे मुद्देसर्वत्र पार्किंगचा गंभीर प्रश्न
रस्ते खोदाईमुळे धुळीचे साम्राज्य
अनियमित पाणीपुरवठा
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
शॉपिंग सेंटरमध्ये असुविधा