मुंबई : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पार पाडण्यासाठी पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होणाऱ्या सुमारे ५० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोमवार (ता. २९)पासून मुंबईत सात विविध केंद्रांवर प्रशिक्षण सत्रांचा सुरुवात होत आहे.
महापालिकाआयुक्त भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी रविवारी (ता. २८) सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी ‘मास्टर ट्रेनर्स’मार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Mumbai Pollution: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई! ३७ प्रकल्पांना पावणेदोन कोटींचा दंडयामध्ये प्रशिक्षण कालावधी २९ डिसेंबर ते ३ जानेवारी आणि ५ जानेवारी ते ९ जानेवारी २०२६ असा असणार आहे. सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सत्रात संगणकीय सादरीकरणाद्वारे सखोल मार्गदर्शन केले जाईल.
यामध्ये प्रामुख्याने, मॉक पोल (नमुना मतदान) - प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणारी चाचणी, ईव्हीएम हाताळणी, आचारसंहिता अंमलबजावणी, तक्रार निवारण यांचा समावेश आहे.
Vijay Kokate: विजय कोकाटे यांची न्यायालयात धाव, शिक्षेला स्थगिती देण्याची मागणीसहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले यांच्यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी आणि विविध विभागांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
तांत्रिक अचूकतेवर भर५० हजार कर्मचाऱ्यांच्या या महाप्रशिक्षणामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक यंत्रणा आता पूर्णपणे सक्रिय होत आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही सक्षम मनुष्यबळ उभे करीत आहोत. प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक अचूकता राखण्यावर आमचा विशेष भर आहे, असे करनिर्धारण व संकलन विभागाचे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले.