Water That Reduces Belly Fat : पोटाची चरबी कमी करणारे 'हे' पाणी; घरी कसे तयार करायचे जाणून घ्या...
esakal December 30, 2025 11:45 AM

Fennel Water Benefits

सकाळी रिकाम्या प्या पोटी बडीशेप पाणी

घराघरात सहज उपलब्ध असलेल्या बडीशेपच्या बियांमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. नियमितपणे बडीशेप पाणी पिल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते, तसेच शरीर आरोग्यदायी राहते. जाणून घेऊया बडीशेप पाण्याचे फायदे आणि ते बनवण्याची सोपी पद्धत.

Fennel Water Benefits

भूक नियंत्रणात राहते

बडीशेप पाणी पिल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते आणि अतिरिक्त कॅलरीज घेणे टाळता येते.

Fennel Water Benefits

चयापचय वाढवते

बडीशेप पाण्यातील नैसर्गिक घटक चयापचय क्रिया वेगवान करतात. यामुळे शरीर अधिक कॅलरीज बर्न करते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Fennel Water Benefits

पचनसंस्था मजबूत होते

बडीशेप पाणी पचन सुधारण्यास उपयुक्त ठरते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Fennel Water Benefits

शरीर विषमुक्ती होते

दररोज बडीशेप पाणी पिल्याने शरीरातील हानिकारक विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.

Fennel Water Benefits

पोटाची चरबी कमी होण्यास मदत

बडीशेपमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील अतिरिक्त पाणी व चरबी कमी करण्यास सहाय्यक ठरतात. नियमित सेवन केल्यास पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Fennel Water Benefits

तोंडाची दुर्गंधी दूर होते

बडीशेप पाणी पिल्याने तोंडातील दुर्गंधी कमी होते आणि श्वास ताजा राहतो.

Fennel Water Benefits

बडीशेप पाणी कसे बनवावे?

एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. त्यात दोन चमचे बडीशेप घालून पाणी सुमारे ५ मिनिटे उकळा. नंतर पाणी थंड करून गाळून घ्या आणि प्या.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप पाणी पिल्यास वजन कमी करण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. अशाच आरोग्यविषयक उपयुक्त बातम्यांसाठी esakal.com वाचत रहा.

Beetroot Pomegranate Benefits

येथे क्लिक करा... रक्ताची कमतरता कायमची दूर! 'ही' दोन फळं एकत्र खाल्ल्यावर काय होतं पाहाच…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.