Vijay-Rashmika Wedding: 'लग्नाची तारीख कळली...'; रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार विवाह बंधनात
Saam TV December 30, 2025 03:45 PM

Vijay-Rashmika Wedding: दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लवकरच त्यांच्या नात्याला एक नवीन नाव देणार आहेत. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या कपलने ऑक्टोबरमध्ये एका अतिशय खाजगी समारंभात साखरपुडा केला आणि आता लवकरच लग्न करणार आहेत. लग्नाची तारीख उघड झाली आहे.

विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची तारीख

एचटी सिटीच्या सूत्रांनुसार, हे स्टार कपल फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहे. साखरपुड्याप्रमाणेच हे लग्नही अत्यंत साधेपणाने आणि खाजगी पद्धतीने पार पडणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानातील उदयपूर येथे लग्न करणार आहेत. या कपलने लग्नासाठी एक शाही वारसा असलेला राजवाडा निवडला आहे. जिथे फक्त कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित राहतील.

Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल

खाजगी समारंभात लग्न करणार

दोन्ही स्टार्स त्यांचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच हा विवाह बॉलीवूड किंवा दक्षिण भारतीय उद्योगातील सामान्य लग्नांपेक्षा जास्त चर्चेत असलेला आहे. लग्नानंतर ते हैदराबादमध्ये किंवा इतर शहरात इंडस्ट्री मित्रांसाठी स्वतंत्र रिसेप्शन देतील करतील की नाही हे सध्या स्पष्ट नाही.

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा
View this post on Instagram