मुंब्रा येथे घरफोडी ः दागिने चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : मुंब्रा येथील खान कंपाउंड भागातील एका महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ९५ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शायना खान खाजगी इव्हेंटमध्ये नोकरी असून त्या मुलासह खान कंपाउंडमध्ये राहतात. त्यांची लहान बहिणी आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी गेले होते. त्यादिवशी शायना खान या बहिणाकडे राहिल्या. शनिवारी (ता. २७) शायना यांच्या मुलाने फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. यामध्ये चोरट्याने ४९ हजारांचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २८ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट, १२ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट, दोन हजारांची चांदीची अंगठी आणि रोख चार हजार असा ९५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून डायघर पोलिस पुढील तपास करत आहेत.