कन्नड : तालुक्यातील कविटखेडा–हसनखेडा गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत प्रस्तावित सिंचन विहिरींच्या १८ संचिका गेल्या अनेक महिन्यांपासून पंचायत समितीतील मनरेगा विभागाच्या कार्यालयात मंजुरीविना पडून असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश पवार यांनी मंगळवारी (ता. ३०) पंचायत समिती कार्यालयात योगेश पवार यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
मात्र, उपस्थित कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली. या संचिकांना येत्या दोन ते तीन दिवसांत सिंचन विहिरींच्या सर्व संचिकांना मान्यता देऊन कामे मार्गी लावण्यात आली नाहीत, तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात बिडीओ यांच्या समोर पुन्हा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात तसेच प्रशासनात खळबळ उडाली असून, आता पंचायत समिती प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune News : पुणे महानगर क्षेत्रासाठी ३२ हजार कोटींचा निधी मंजूरकविटखेडा–हसनखेडा गावातील शेतकरी पावसावर अवलंबून असून सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे. मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून १८ संचिका मंजुरीसाठी कार्यालयात पडून आहेत. अनेक वेळा मनरेगा विभाग, संबंधित अधिकारी व पंचायत समिती प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही.
संबंधितांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा निवेदन न देता हा प्रकार केला आहे . त्यांनी गावातील १८ लाभार्थी यांना मंजुरी देण्याची मागणी केली आहे. लवकरच गावात पाहणी करून लाभार्थी यांची कागदपत्रे तपासून मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
ओमकुमार रामावत ( गटविकास अधिकारी, कन्नड)