MHADA House Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून घरांच्या सोडतीसाठी तयारी सुरु; कधी निघणार लॉटरी?
esakal December 31, 2025 11:45 AM

मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास दीड दिवस बाकी असून रेल्वे, एसटी, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु असून म्हाडाने नवंवर्षानिमित्त घरांच्या सोडतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

म्हाडामुंबई मंडळाने २०२६च्या घरांच्या सोडतीसाठी तयारी सुरु केली आहे. यामध्ये वांद्रे पूर्व येथील मोक्याच्या 'एमआयजी' (MIG) वसाहतीतील ४४ घरांचा समावेश होणार आहे. ही घरे मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) राखीव असणार आहेत.

Mumbai News: नववर्ष स्वागताच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर; नियम मोडल्यास कारवाई घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात

म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व भागातील खेरवाडी, गांधीनगर आणि एमआयजी वसाहतींमधील जुन्या इमारतींचा पुनर्विकास केला जात आहे. यामध्ये एमआयजी वसाहतीमधील 'ओबी १०' आणि '११' या इमारतींचा पुनर्विकास एका खासगी विकासकाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या पुनर्विकासातून म्हाडाला ४४ घरांचा साठा उपलब्ध झाला आहे.

सध्या या घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून मार्च २०२६ पर्यंत या २२ माजली इमारतीचे काम पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल २०२६मध्ये ही घरे अधिकृतपणे मंडळाच्या ताब्यात येतील, अशी माहिती आहे.

घरांची रचना

दरम्यान, या घरांचे क्षेत्रफळ ६६ ते ८५ चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर दोन सदनिका अशी या इमारतीची रचना असून पहिल्या दोन मजल्यांवरील घरे प्रशस्त ८५ चौरस मीटरची आहेत. तर उर्वरित मजल्यांवरील घरे ७६ चौरस मीटरची आहेत.

Police Action Mode: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी! उल्हासनगर शहरात पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम

मात्र बीकेसीसारख्या व्यावसायिक केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि या भागातील जमिनीचे दर लक्षात घेता या घरांची किंमत म्हाडाच्या इतर घरांच्या तुलनेत महाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मार्च २०२६ मध्ये या घरांच्या लॉटरीचीजाहिरात प्रसिद्ध करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.