Kolhapur Cricut Bench : कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मोठे फेरबदल; वृषाली जोशी व आर. जी. अवचट यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती
esakal December 31, 2025 11:45 AM

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, एस. जी. चपळगावकर आणि शिवकुमार डिगे यांच्या आज बदल्या झाल्या. त्यांच्या ठिकाणी वृषाली जोशी आणि आर. जी. अवचट यांची नियुक्ती झाली आहे.

न्यायमूर्ती कर्णिक आणि डिगे मुंबई उच्च न्यायालयात, तर न्यायमूर्ती चपळगावकर यांची छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे नियुक्ती झाली आहे. बदल्या आज झाल्या असल्या, तरीही पाच जानेवारीपासून आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ व सर्किट बेंचमधील न्यायमूर्तींच्या आज बदल्या जाहीर झाल्या. मुंबई, गोवा, औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर सर्किट बेंच येथील एकूण बारा न्यायमूर्तींच्या बदल्या झाल्याचे आदेशात म्हटले आहे.

Kolhapur Municipal : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्हा परिषदेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

यामध्ये कोल्हापूर सर्किट बेंचच्या तिघांचा समावेश आहे. नव्याने नियुक्त झालेले न्यायमूर्ती जोशी आणि न्यायमूर्ती अवचट दोन्ही न्यायमूर्तींनी यापूर्वी कोल्हापुरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.

झालेल्या बदल्यांमध्ये न्यायमूर्ती एम.एस.सोनक, सारंग कोतवाल, अभय मंत्री, निरज धोटे, अमित जामसांडेकर, श्रीराम शिरसाट, रजनीश व्यास यांचा समावेश आहे.

Kolhapur Circuit Bench : राज्यपालांच्या आमदार नियुक्तीवरून उद्भवलेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका वर्ग केली
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.