पत्नीने तिसऱ्या बाळाचा जन्म देतात, या पाकिस्तानी क्रिकेटरने घेतला घटस्फोट, सानिया मिर्झा हिच्यानंतर थेट…
Tv9 Marathi January 01, 2026 03:45 PM

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सानिया मिर्झाने हिने मोठा काळ टेनिसमध्ये गाजवला असून तिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सानिया ही भारताची टॉप टेनिस स्टार असताना तिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. सानिया मिर्झा हिच्या या निर्णयानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर त्यादरम्यान तिच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. सानिया मिर्झा आणि शोएबला एक मुलगा असून 2024 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोट झाल्याची घोषणा होण्यापूर्वी शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. ज्यावेळी शोएबने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

सानिया मिर्झा ही घटस्फोटानंतरही दुबईत राहत असून मुलासोबत ती अधिक वेळ घालवताना दिसते. घटस्फोटानंतर परिस्थिती नेमकी कशी होती हे सांगतानाही सानिया दिसली. शोएब मलिक याच्यानंतर अजून एका पाकिस्तानी क्रिकेटरने पत्नीला धोका दिला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर इमाद वसीम याने 2o15 ते 2024 पर्यंत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. इमाद वसीमने ऑगस्ट 2019 मध्ये इस्लामाबादमध्ये सानिया अशफाकशी लग्न केले होते.

2021 मध्ये एक मुलगी त्यांना झाली. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर तिसरे बाळही झाले. आता थेट लग्नाच्या सहा वर्षानंतर क्रिकेटर इमाद आणि सानिया यांनी घटस्फोट घेतला. सानिया हिने सोशळ मीडियावर इमाद याच्यावर गंभीर आरोप करत घटस्फोट घेण्यामागील कारण सांगून टाकले. सानिया अशफाकने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपले दुःख व्यक्त केले

तिने म्हटले की, मी हे खूप वेदनेत लिहित आहे. माझे घर उद्ध्वस्त झाले आणि माझी मुले आता वडिलांविना झाली आहेत. मी आज तीन मुलांची आई आहे. त्यापैकी एक बाळ नुकताच जन्मलेले आहे. त्या बाळाला वडिलांनी अजून हातही लावला नाही. वडिलांचा कुशीत ते कधी गेले पण नाही. मुळात म्हणजे मला कधी ही गोष्ट सांगायची नव्हती. पण कधीकधी तुम्ही बोलत नाहीत, त्यावेळी तुम्हाला हातबळ समजले जाते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.