Vodafone Idea Share Price : देशभरात टेलिकॉम क्षेत्रातील घडामोडी कायम चर्चेत असतात. पण जेव्हा विषय वोडाफोन आयडिया चा असेल तर लोकांची उत्सुकता आणखी वाढते. आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी Vodafone Idea साठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनीच्या AGR (Adjusted Gross Revenue) थकबाकीशी संबंधित दिलासा पॅकेजला मंजुरी दिली आहे.
सरकारचा मोठा निर्णय काय आहे?केंद्र सरकारने कंपनीची 87,695 कोटी रुपयांची AGR थकबाकी स्थिर (फ्रीज) केली असून 5 वर्षांचा मोरेटोरियम दिला आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कंपनीला पुढील पाच वर्षे या थकबाकीच्या भरण्याची चिंता करावी लागणार नाही. सरकारने दिलेल्या नियमानुसार, आता या थकबाकीची परतफेड आर्थिक वर्ष 2032 पासून सुरू होईल आणि 2041 पर्यंत पूर्ण करावी लागेल.
New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्ससरकारचा हा निर्णय Vodafone Idea साठी एक मोठी लाईफलाइन मानला जात आहे. जुने आकडेवारी जर बघितली तर कंपनीवर सुमारे 83,400 कोटी रुपये थकबाकी होती, जी आता 87,695 कोटी रुपयांवर लॉक करण्यात आली आहे. म्हणजेच व्याज आणि दंड वाढण्याची प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे.
शेअर बाजारात मात्र चिंतासरकारकडून एवढा मोठा दिलासा मिळूनही शेअर बाजारात Vodafone Idea आणि Indus Towers बाबत नकारात्मक वातावरण कायम आहे. इतक्या मोठ्या मदतीनंतरही निराशा का, असा प्रश्न पडू शकतो. खरं तर बाजाराला अपेक्षा होती की सरकार यावेळी किमान 50% AGR माफी (कर्जमाफी) जाहीर करेल. Vodafone Idea ने सुमारे 45,457 कोटी रुपयांच्या माफीची मागणी केली होती. मात्र सरकारने कर्ज माफ न करता फक्त परतफेडीसाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मते कर्ज अजूनही आहे, फक्त त्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याच कारणामुळे या शेअर्सवर दबाव आहे.
GST विभागाकडून कारवाईएका बाजूला AGR ची अडचण असताना, दुसऱ्या बाजूला कर विभागानेही कंपनीला दणका दिला आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी कंपनीने एक्सचेंजला माहिती दिली की तेलंगणा GST विभागाने कंपनीवर मोठा दंड ठोठावला आहे.
हा प्रकार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये Input Tax Credit (ITC) चा चुकीचा दावा केल्याशी संबंधित आहे. विभागाने Vodafone Idea वर 6,78,07,980 रुपये (सुमारे 6.78 कोटी रुपये) दंड आकारला आहे. कंपनीने या निर्णयाशी असहमती दर्शवली असून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे सांगितले आहे, मात्र सध्या ही बाब कंपनीसाठी नवी अडचण ठरली आहे.
New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम? जुने आणि नवे आकडे काय सांगतात?AGR थकबाकीचे जुने आकडे पाहिल्यास परिस्थिती अधिक स्पष्ट होते.
Vodafone Idea ची मूळ थकबाकी फक्त 12,797 कोटी रुपये होती
व्याज आणि दंडामुळे ही रक्कम वाढून 83,400 कोटी रुपये झाली
कंपनीने आतापर्यंत सुमारे 8,000 कोटी रुपये भरले आहेत.
तुलनेत Airtel ची एकूण AGR थकबाकी 43,980 कोटी रुपये आहे.