नवीन वर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळाला. मोठ्या संख्येने लोक घराच्या बाहेर पडून नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसले. एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये होता. मात्र, नवीन वर्षाच्या दिवशी मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. या स्फोटात अनेक लोक ठार झाले असून मोठी खळबळ उडाली. नवीन वर्षाचा आनंद लोक साजरा करत असतानाच हा स्फोट झाला. स्वित्झर्लंडमध्ये हा स्फोट झाला. स्फोट अचानक झाला. कोणालाही काहीही कळण्याच्या आत हा स्फोट झाला आणि एकच धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट स्वित्झर्लंडमधील क्रान्स-माँटाना शहरात झाला. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी मदत कार्य राबवण्यात आले आणि जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटानंतर मोठी आग पबमध्ये लागली.
आगीमध्ये अनेक लोक अडकले होते, हळूहळू करून पोलिसांनी अनेकांना आगीतून बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मोठी पार्टी सुरू होती. यावेळी लोकांची प्रचंड गर्दी होती. अचानक स्फोट झाला आणि काही सेकंदात आग सर्वत्र पसरली आणि एकच गोंधळ उडाला. आग नेमकी कशाने लागली याची माहिती अजून मिळू शकली नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत अनेक लोक गंभीर जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. मृतांचा नेमका आकडा किती हे सध्याच सांगणे शक्य नसल्याचे पोलिसांनी म्हटले. हा स्फोट रात्री 1.30 च्या दरम्यान झाल्याचे सांगितले जाते. ले कॉन्स्टेलेशन नावाच्या बारमध्ये हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळतंय.
ले कॉन्स्टेलेशन बार अत्यंत प्रसिद्ध असून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तिथे लोक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. नवीन वर्षाचा उत्सव साजरा करत असताना हा स्फोट झाला. सध्या पोलिसांनी हा स्फोट नेमका कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या स्फोटाचे अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारी व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहेत. जग आनंदात असताना ही घटना घडली असून अनेक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.