Zohran Mamdani: हिंदू आईच्या पोटी जन्म, या भारतीय वंशाच्या नेत्याची कुराणावर हात ठेवत महापौर पदाची शपथ, जगाला काय दिला तो खास संदेश?
Tv9 Marathi January 01, 2026 04:45 PM

Mayor Zohran Mamdani take oath use Quran: अमेरिकेच्या वेळेनुसार, नवीन वर्षाची 2026 सुरुवात झाली आहे. त्याचवेळी अमेरिकेत एक क्रांतीकारक घटना घडली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जोहरान ममदानी यांनी पवित्र कुराणावर हात ठेवत न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून शपथ घेत आहेत. असे करणारे ते या आधुनिक शहरातील पहिले महापौर ठरणार आहेत. ममदानी यांची टीम गुरुवारी 1 जानेवारी रोजी दोन स्वतंत्र शपथविधी सोहळा आयोजित केला आहे. न्यूयॉर्क शहराच्या जुन्या परंपरेनुसार, नवीन महापौर पदाचा कार्यकाळ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. पहिला शपथविधी हा रात्री एका जुन्या सबवे स्टेशनमध्ये होणार आहे.अटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्स ममदानी यांना शपथ देतील.

शपथविधीसाठी जुने सबवे स्टेशन उघडणार

हे ऐतिहासिक स्टेशन शहरातील सर्वात जुन्या अंडरग्राऊंड लाईनच्या सुरुवातीच्या थांब्यांपैकी एक आहे. हे स्टेशन 1945 पासून बंद आहे. सर्वसामान्यांसाठी ते कधीतरी उघडते. या शपथविधीनंतर दुपारी एक मोठा कार्यक्रम होईल. सिटी हॉलबाहेर हा कार्यक्रम होईल. मावळते महापौर मेयर एरिक एडम्स आणि माजी महापौर बिल डी ब्लासियो यांनी यापूर्वी अशाप्रकारच्या परंपरांचे पालन केले होते. त्यानुसार, नवीन वर्ष सुरु होताच हा शपथविधी पार पडतो. त्यानंतर दुपारी मोठा सार्वजनिक कार्यक्रम होतो.

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, आपल्या दोन्ही शपथविधी कार्यक्रमादरम्यान जोहरान ममदान हे पवित्र कुराणावर हात ठेवतील आण शपथ घेतील. यावेळी तीन कुराण प्रति असतील. एका ज्येष्ठ सल्लागार जारा रहीम यांनी सांगितले की, ममदानी हे मध्यरात्री शपथविधी सोहळ्यासाठी त्यांचे आजोबांच्या कुराणावर हात ठेवतील. तर त्याचवेळी ते कृष्णवर्णीय लेखक आणि इतिहासकार आर्टुरो शॉम्बर्ग यांच्या कुराणाची प्रतही त्यांच्याजवळ असेल. न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीकडून त्यांनी हे कुराण या शपथविधीसाठी तात्पुरते मागवून घेतले आहे. सिटी हॉलमधील शपथविधी कार्यक्रमात ममदानी हे कुटुंबातील कुराण प्रत सोबत आणतील. ममदानी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.