rat३१p१३.jpg-
१४६५६
रत्नागिरी : कबड्डी स्पर्धेतील विजेत्या दसपटी क्रीडा मंडळाच्या संघासोबत आमदार किरण सामंत.
-----------
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दसपटी संघ विजयी
पाली येथे आयोजन; महिला गटात रत्नागिरी विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाली युवा मंचच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात चिपळूणच्या दसपटी क्रीडामंडळाने तर महिला विभागात रत्नागिरी तालुका महिला संघाने विजेतेपट पटकावले.
या स्पर्धेत पुरुष गटात १६ तर महिला गटात ४ संघ सहभागी झाले होते. पुरुषांचा अंतिम सामना रंगतदार झाला. अंतिम सामन्यात दोन्ही संघ चिपळूण तालुक्यातील एकमेकांविरोधात उभे होते. दसपटी क्रीडामंडळाने चिपळूणमधील गुरुकुल संघावर चार गुणांनी मात करीत विजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांक चिपळूणच्या संघर्ष क्रीडामंडळाने तर चतुर्थक्रमांक रत्नदीप क्रीडामंडळ मिरजोळे रत्नागिरी यांनी पटकावला. अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार शुभम कदम याने, अष्टपैलू खेळाडू अभि शिंदे, उत्कृष्ट पकड निलेश व आकाश शिंदे, उत्कृष्ट चढाई शुभम कदम यांना गौरवण्यात आले. महिला विभागात रत्नागिरी तालुका महिला संघाने लांजा तालुका महिला संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू खेळाडूचा मान मैथिली गावकर आणि उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार स्वरा भाटकर हिला देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांना संघांना आमदार किरण सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी पाली युवा मंचचे अध्यक्ष अमेय वेल्हाळ, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेनेचे मुन्ना देसाई, जिल्हा बँक संचालक रामभाऊ गराटे, उपसरपंच संतोष धाडवे आदी उपस्थित होते.