Vastu Shastra : घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवण्याचे आहेत फायदेच -फायदे, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
Tv9 Marathi January 02, 2026 12:45 AM

वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती किंवा प्रतिमा असतात, ज्या घरात ठेवल्यास त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काहीही कारण नसताना पत्नी-पत्नीमध्ये वादविवाद होतात. गृहकलह वाढतो, तसेच अनेक आर्थिक समस्या देखील निर्माण होतात. या मूर्ती किंवा प्रतिमांमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावरच होतो, त्यामुळे अशा मूर्ती किंवा प्रतिमा घरात असू नये असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, या उलट घरात अशा देखील काही प्रतिमा किंवा मूर्ती असतात, ज्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. घरात आनंदी वातावरण राहातं, वादविवाद होत नाहीत. अशाच एका मूर्तीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. घरात पितळेची सिंहाची मूर्ती ठेवणं खूपच शुभ मानलं गेलं आहे, वास्तुशास्त्रामध्ये घरात पितळेची सिंहाची मूर्ती ठेवण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.

घरात सिंहाची मूर्ती ठेवल्यानं काय होतं?

सिंह हा प्राणी निडरता, आत्मविश्वास आणि चपळता यांचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा तुमचा आत्मविश्वास कमजोर असेल. तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नसतील तर अशावेळी घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवता, तेव्हा तुमच्या आत्मविश्वासात वाढ होते, तुम्ही कोणतेही निर्णय आत्मविश्वासाने घेऊ लागता. एवढंच नाही तर तुमच्या मनात एखादी अनामिक भीती असेल तर अशी भीती देखील घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवल्यामुळे दूर होते.

पितळ हा धातू गुरू ग्रहाशी संबंधित आहे. ज्याचा गुरू ग्रह कमजोर आहे, किंवा ज्या लोकांना गुरूबळ नाही अशा लोकांनी घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवावी असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवल्यास गुरूचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो. तसेच घरात जर पितळेच्या सिंहाची मूर्ती असेल तर घरातील लहान मुलांना देखील अभ्यासात मदत होते. मुलांचं मन अभ्यासात एकाग्र होते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.