देशातील पहिल्या वंदेभारत स्लिपर ट्रेनच्या मार्गाची घोषणा अखेर रेल्वे मंत्र्यांनी केली आहे. बंगाल निवडणूकांच्या आधी केंद्र सरकारने पूर्वेकडील राज्ये आणि पूर्व भारताला जोडणाऱ्या रेल्वे योजनेची घोषणा केली आहे. भारतीय रेल्वे लवकरच देशाची पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कोलकाताच्या दरम्यान सुरु करत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सेमी हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
ही अत्याधुनिक वंदेभारत स्लीपर ट्रेन लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना आरामात झोपून जाण्यासाठी डिझाईन केली आहे. ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असेल आणि यात एकूण १६ डब्बे असतील. ज्यात ११ एसटी ३- टियर, ४ एसी २-टियर आणि १ एसी फर्स्ट क्लास कोचचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये एकूण ८२३ प्रवासी प्रवास करु शकतील.
१८० किमी प्रति तास वेगाची ट्रायलवंदेभारत स्लीपर ट्रेनची डिझाईन स्पीड १८० किमी/प्रति तास आहे. तर यास व्यावसायिक रुपाने १६० किमी प्रती तास चालवता येऊ शकते. कोटा-नागदा सेक्शनमध्ये या ट्रेनच्या ट्रायल रनच्या दरम्यान ट्रेनने १८० किमी/प्रति तास वेग गाठला होता. आणि ही ट्रेन स्थिरता चाचणीत पाण्याने ग्लास भरुन टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी ग्लासातील पाणी सांडले नव्हते.
भारतीय रेल्वेच्या मते गुवाहाटी ते हावडाच्या दरम्यान वंदेभारत स्लिपर ट्रेनचे भाडे विमान प्रवासाच्या तुलनेत स्वस्त असेल असे म्हटले जात आहे.
काय असणार भाडे ?एसी ३-टियर: ₹२,३००
एसी २-टियर: ₹३,०००
एसी फर्स्ट क्लास: ₹३,६००
प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधावंदे भारत स्लिपर ट्रेनमध्ये युरोपियन डिझाईन स्टँडर्डवर आधारित कोच असतील. ज्यात आरादायी गादीचे बर्थ, चांगले अपर बर्थ एक्सेस आणि रात्रीच्या वेळी सॉफ्ट लायटींगची सुविधा असेल. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिज्युअल इन्फॉर्मेशन डिस्प्ले, पब्लिक एड्रेस सिस्टीम आणि मॉड्युलर पेन्ट्री युनिट उपलब्ध असेल.
स्वच्छता आणि सुरक्षेला ध्यानात घेऊन यात एडवांस्ड बायो-वॅक्यूम टॉयलेट, दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष शौचालय, बेबी केअर एरिया आणि फर्स्ट क्लास कोचमध्ये गरम पाण्याची शॉवर बाथची सोय देण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये टक्कर विरोधी तंत्रज्ञान ‘कवच’ एण्टी-कोलिजन सिस्टम लावण्यात आली आहे. प्रत्येक कोचमध्ये पर्सनल रीडिंग लाईट, मोबाईल चार्जिंग पॉईंट, फोल्डेबल टेबल आणि इर्मजन्सी टॉकबॅक सिस्टम असणार आहे. त्यामुळे आपतत्कालिन स्थितीत प्रवाशांना लोको पायलट आणि गार्डशी संपर्क करता येणार आहे.
स्थानिक पदार्थांचा आस्वादगोवाहाटीतून सुटणाऱ्या या ट्रेनमध्ये प्रवाशांना आसामी अन्नपदार्थ, तर कोलकाताहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये बंगाली अन्नपदार्थ दिले जाणार आहे. भारतीय रेल्वेने येत्या सहा महिन्यात आणखी आठ वंदेभारत स्लीपर ट्रेन सुरु करण्याची योजना आखली आहे. तर वर्षाच्या अखेर यांची संख्या १२ होणार आहे. येत्या वर्षांत २०० हून अधिक वंदेभारत स्लीपर देशभरात चालवण्याची योजना आहे.