दुबईत ईशा देओलचं न्यू इअर सेलिब्रेशन, धर्मेंद्र यांच्या आठणवीत केली अशी पोस्ट; सावत्र भाऊ बॉबीची कमेंट चर्चेत
Tv9 Marathi January 02, 2026 01:45 AM

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला असला तरी त्यांचे कुटुंबीय, त्यांची मुलं या दु:खातून अद्याप सावरले नाहीत. मुलगी ईशा देओल वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. तर धर्मेंद्र यांच्या शेवटच्या ‘इक्कीस’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान सनी देओल भावूक झाल्याचं पहायला मिळालं. 31 डिसेंबर 2025 रोजी जिथे सर्व जगाने सरत्या वर्षाला निरोप दिला आणि त्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत केलं, तिथे ईशा देओलने वडिलांच्या आठवणीत काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट करण्यापासून सावत्र भाऊ बॉबी देओल स्वत:ला रोखू शकला नाही.

ईशानेदुबईत नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी जरी तिचे वडील तिच्यासोबत नसले तरी नवीन वर्षांत ईशाने त्यांच्या आठवणीत खास पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती आकाशाकडे बोट दाखवून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये ती आकाशात ‘लव्ह यू पापा’ असं लिहिलेलं पहायला मिळत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ईशाने लिहिलं, “तुम्ही नेहमी सुखी, निरोगी आणि बलवान रहा. सर्वांना खूप सारं प्रेम.” या फोटोंवरील बॉबी देओलच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बॉबीने कमेंट बॉक्समध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यावर ईशानेही हार्ट इमोजी पोस्ट करत रिप्लाय दिलं.

View this post on Instagram

A post shared by ESHA DHARMENDRA DEOL (@imeshadeol)

बॉबी देओलची कमेंट-

ईशा देओल ही धर्मेंद्र आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांची मुलगी आहे. तर बॉबी हा धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी एक आणि हेमा मालिनी यांनी दुसऱ्या शोकसभेचं आयोजन केलं होतं. हे दोन्ही कुटुंब वेगवेगळे असले तरी ईशा, अहाना देओल यांचं सनी आणि बॉबी देओलसोबत चांगलं नातं असल्याचं पहायला मिळतं. ईशा देओलने सनी देओच्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. तेव्हा सनी आणि बॉबीसोबत ईशाने एकत्र फोटोसुद्धा काढले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.