न्यूट्रिशनिस्ट सांगितले फिट राहण्याचे 5 नियम, संपूर्ण वर्ष रहाल तंदुरुस्त आणि निरोगी
Tv9 Marathi January 02, 2026 06:45 AM

नवीन वर्षांच्या सुरुवातीला अनेक लोक रिझोल्युशन करतात. यंदा फिट, हेल्दी आणि एनर्जेटिक रहायचे. परंतू काही दिवस या चांगल्या सवयी स्वीकारल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरु होते. आरोग्यदायी रहाण्यासाठीचे नियम काही कठीण नाहीत. काही सोप्या आणि योग्य सवयीची गरज लागते. त्या दीर्घकाळ स्वीकाराव्या लागतात. खास बाब म्हणजे हेल्दी रहाण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण लाईफस्टाईल बदलण्याची काही गरज नाही. अलिकडेच एका न्युट्रीशनिस्टने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आरोग्यासाठीच्या चांगल्या सवयींचा उल्लेख केला आहे. ज्या वर्षभर अंगी बाणवण्याची गरज आहे.

न्यूट्रिशनिस्ट सांगितलेल्या चांगल्या सवयी अशा आहेत ज्या कोणीही रोजच्या जीवनात सामील करु शकतो. त्या स्वीकारुन तुम्ही केवळ फिट नव्हे तर संपूर्ण वर्षे स्वत:ला फ्रेश, एक्टीव्ह आणि एनर्जेटीक देखील ठेवू शकता. चला तर पाहूयात या 5 सवयी किंवा नियम कोणते ते ?

1. फ्रिजमध्ये हेल्दी वस्तू ठेवा –

न्यूट्रिशनिस्टचा पहिला सल्ला आहे की फ्रिजमधून सर्व जंक फूड्स हटवा. त्याजागी फळे, भाज्या, मिलेट्स, असे पदार्थ ठेवा. फ्रिजला स्टोरेज नव्हे हेल्दी खाण्याची सुरुवात म्हणून माना. पॅकेट्सवाले हेल्दी फूड्स वा प्रोटीन संपूर्ण चुकीचे नाहीत. परंतू जास्तीत जास्त फ्रेश आणि कमी प्रोसेस्ड अन्न खा

2. जास्त धावा आणि एक्टीव्ह राहा

न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा यांच्या मते धावणे किंवा वेगाने चालणे मेंटल क्लॅअरिटी खूप चांगले आहे.एका अभ्यासात रोज केवळ 10 मिनिटांचे हल्के धावणे देखील मेंदूच्या त्या भागांना एक्टीव्ह करते जे मूड आणि तणावाला नियंत्रित करते. यामुळे डोकं फ्रेश राहते आणि तणाव कमी होतो.

3. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक फूड खा

गट हेल्थला ( पोटासहीत ) प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी डाएटमध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक फूड्सचा समावेश करण्याचा सल्ला न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा यांनी दिला आहे. प्रोबायोटिक फूड्स उदा.पनीर, इडली, डोसा, ताक, लोणचे, कांजी, ढोकला, हिरवे वाटाणे, बीट, आणि व्होल व्हीट ब्रेड पोटाच्या चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात आणि पचन यंत्रणा चांगली करतात.

4. लवकर झोपण्याची सवय लावा

आजकाल वाढता तणाव शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढवतो. यामुळे सूज आणि अनेक आजार होऊ शकतात. त्यास नियंत्रण करण्यासाठी लवकर झोपणे गरजेचे आहे. वेळेवर झोपल्यास हार्मोन्स बॅलन्स रहातात आणि शरीरास योग्य आराम मिळतो.

5. तुमचे गोल्स लिहा

न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा यांनी सल्ला दिला आहे की तुमचे गोल्स रोज लिहा. यामुळे तुम्हाला तुमचे ध्यैय लक्षात राहातात आणि त्यांना गाठण्याची प्रेरणा मिळते. ही सवय तुमचा फोकस आणि कमिटमेंटला मजबूत बनवते.

येथे पोस्ट पाहा –

View this post on Instagram

A post shared by Deepsikha Jain (@fries.to.fit)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.