Maharashtra SSC Board Exam 2026: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने SSC (दहावी) बोर्ड परीक्षा 2026 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्याथ्यांना त्यांच्या अभ्यास कसा करायचा हे ठरवणे आता सोपे होण्याची शक्यता आहे.
बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यासाठी अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे वेळापत्रक पाहून नियोजनपूर्वक अभ्यास करण्याची ही चांगली संधी आहे. वेळापत्रक पाहण्यासाठी www.mahahsscboard.inअधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
पाहूया अंदाजे परीक्षांच्या तारीखादहावी परीक्षा
साधारणपाने २० फेब्रुवारी, २०२६ पासून सुरु होणार आहे.
प्रत्येक विषयाची तारीख, वेळ आणि कालावधी वेळापत्रकात नमूद केली आहे.
बारावी परीक्षा
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.
वेळापत्रक पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व विषयांसाठी तयारीचे नियोजन करावे.
पहिला पेपर
१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी/ गणित (तारीख आधी जाहीर केली जाईल)
१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित शाखेतील महत्वाचे विषय (विज्ञान/वाणिज्य/कला)
वेळापत्रक जाहीर होताच अधिकृत तारीख तपासणे आवश्यक आहे.
तयारीसाठी टिप्सअभ्यासाचे नियोजन: प्रत्येक विषयाच्या अवघड भागावर अधिक वेळ द्या.
दररोज सराव: गणित, विज्ञान, अकाउंट्स यांसारख्या विषयांसाठी नियमित सराव आवश्यक.
नोट्स तयार करा: महत्त्वाचे मुद्दे, सूत्रे व तारीखा एका नोटबुकमध्ये लिहा.
मागील वर्षांची प्रश्नपत्रिका: परीक्षेचा प्रकार समजून घेण्यासाठी सराव करा.
टप्प्याटप्प्याने तयारी: महत्त्वाचे भाग आधी पूर्ण करा, नंतर इतर भागांकडे वळा.
तणाव व्यवस्थापनपरीक्षेच्या काळात तणाव येणे सामान्य आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे:
दररोज 7–8 तास झोप घ्या.
संतुलित आहार घ्या (फळे, भाज्या, ड्राय फ्रूट्स).
हलका व्यायाम, चालणे किंवा योग करा.
आवडते संगीत ऐका किंवा थोडा फेरफटका मारा.
सोशल मीडिया आणि मोबाईल वापर मर्यादित ठेवा.
डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाचा वापरआज डिजिटल साधने अभ्यासासाठी उपयुक्त आहेत:
ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर्स
शैक्षणिक अॅप्स व ई-लर्निंग प्लॅटफॉर्म
ऑनलाइन क्विझ व प्रॅक्टिस पेपर्स
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली डाउट क्लिअरिंग