लखनऊ : उत्तर प्रदेशातील कैसरबाग परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका डॉक्टरने नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार (Nursing Student Assault) केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून कैसरबाग पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी डॉक्टर किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) या सरकारी वैद्यकीय संस्थेत इंटर्न म्हणून कार्यरत होता. लग्नाचे खोटे आश्वासन देत त्याने पीडित विद्यार्थिनीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर जेव्हा विद्यार्थिनीने लग्नाबाबत औपचारिक चर्चा केली, तेव्हा आरोपीने नकार दिला आणि तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणासंदर्भात माहिती देताना कैसरबागचे पोलीस उपायुक्त विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, आरोपी डॉक्टरची पार्श्वभूमी व पत्त्याची तपासणी सुरू असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच पीडित विद्यार्थिनीचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाणार आहे.
Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घावपीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने तिच्याशी मैत्री करून विश्वास संपादन केला आणि प्रेमसंबंधात अडकवले. अलीगंज येथील पीजी हॉस्टेलमध्ये राहणारी ही विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी आरोपीच्या कैसरबागमधील फ्लॅटवर गेली होती. तेथे लग्नाचे आश्वासन देऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, लग्नाचा विषय काढताच आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ केली तसेच तिचे अश्लील फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. गेल्या पंधरा दिवसांत KGMU शी संबंधित हा दुसरा गंभीर प्रकार असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, KGMU च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाला या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.