पारगाव, ता. २ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर यांना महिला आर्थिक विकास महामंडळ (पुणे) अंतर्गत जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्र (मंचर) यांच्या वतीने पुरुष सुधारक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
आंबेगावचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रशांत वाडेकर यांना देण्यात आला. यावेळी महिला विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण, जिल्हा प्रकल्प सल्लागार आशिष दगडे, बालविकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव, कृषी अधिकारी आत्माचे व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे, आंबेगाव तालुका बालविकास पर्यवेक्षिका मंगला हिंगे उपस्थित होते.