पहिला चित्रपट हिट, नंतर फ्लॉपची रांगच लागली; एका रात्रीत स्टार झालेली साध्या घरातली मराठी मुलगी, तुम्ही ओळखलंत?
esakal January 03, 2026 04:45 AM

चित्रपटसृष्टी हे असं ठिकाण आहे जिथे अनेक लोक उराशी स्वप्न बाळगून येतात. इथला झगमगाट त्यांना आकर्षित करतो. इथलं कल्चर, पैसा, लोकप्रियता सगळंच हवंहवंसं वाटतं. पण इथे कुणाचं नशीब कसं पालटेल सांगू शकत नाही. इथे अनेक रंकांचे राव झाले आणि रावांचे रंक झाले. अनेक कलाकार असे आहेत. जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात. मात्र काही चित्रपटांनंतर हे कलाकार इंडस्ट्रीमधून गायब होतात. त्यांच्यावर फ्लॉपचा ठप्पा बसतो. अशीच एक मराठी कलाकार आहे जिने करिअरमध्ये पहिला चित्रपट हिट दिला. मात्र नंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही.

या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी पहिला हिट चित्रपट दिला होता. तेव्हा ती नववी इयत्तेत शिकत होती. मात्र तिने तिच्या अभिनयाने सगळ्यांना चकीत केलेलं. हा चित्रपट प्रचंड गाजला. मात्र त्यानंतर तिने तब्बल ६ मराठी चित्रपटात काम केलं. जे सगळे फ्लॉप ठरले. ही अभिनेत्री दुसरीतिसरी कुणी नासून रिंकू राजगुरू आहे. रिंकूने १४व्या वर्षी 'सैराट' चित्रपटात काम केलेलं. जो सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर तिने 'कागर', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा', 'झिम्मा २', 'बेटर हाल्फची लव्हस्टोरी' अशा काही चित्रपटात काम केलं. हे चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. ती नुकतीच 'आशा' या चित्रपटात दिसली. मात्र हा चित्रपटही खास कमाल दाखवू शकला नाही.

View this post on Instagram

A post shared by Rinku Asha Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)