Arjun Tendulkar समोर मोठं आव्हान; टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलशी होणार सामना, जाणून घ्या ही मॅच कधी व केव्हा रंगणार
esakal January 03, 2026 04:45 AM

Arjun Tendulkar vs Shubman Gill Vijay Hazare Trophy match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतून कर्णधार शुभमन गिल भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. पण, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि भारतीय संघात परतण्यापूर्वी तो कसून सराव करताना दिसतोय. तत्पूर्वी तो अर्जुन तेंडुलकरसमोर ( Arjun Tendulkar) आव्हान उभं करणार आहे. हा सामना कधी व केव्हा रंगणार हे जाणून घेऊयात...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शुभमन गिलची मान दुखावली गेली होती आणि त्यामुळे तो पहिल्या डावात व दुसऱ्या कसोटीतून माघारी परतला होता. त्यानंतर त्याने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतून पुनरागमन केल, परंतु तीन सामन्यानंतर दुखापतीमुळे त्याने उर्वरित दोन लढतीतून माघार घेतली. ट्वेंटी-२०तील खराब कामगिरीमुळे त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील स्थान गमवावे लागले. आता तो वन डे संघात परतणार आहे.

IPL 2026 : बांगलादेश आपला शत्रू नाही...! Mustafizur Rahman वादावर बीसीसीआयने स्पष्ट केली भूमिका, म्हणतात...

११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत खेळण्यापूर्वी शुभमन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सहभाग घेणार आहे. तो आणि अर्शदीप सिंग हा पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. या दोन लढतीत त्याला सिक्कीम व गोवा संघांचा सामना करावा लागणार आहे. यापैकी गोवाविरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या सामन्याच्या निमित्ताने अर्जुन तेंडुलकर वि. शुभमन गिल असा सामना रंगणार आहे. अर्जुन गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

पंजाबचा संघ विजय हजारे ट्रॉफीतील सामने खेळण्यासाठी जयपूर येथे दाखल झाला आहे. ते ३ जानेवारीला सिक्कीमचा आणि ६ जानेवारीला गोवा संघाचा सामना करणार आहेत. अर्जुनची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी काही खास झालेली नाही. विजय हजारे ट्रॉफीत मागील तीन सामन्यांत त्याने अनुक्रम नाबाद १, १९ व २४ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत एकही विकेट न घेता ५८, ४९ व ७८ धावा दिल्या आहेत. त्यामुळे पंजाबविरुद्ध शुभमनविरुद्ध त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय... India vs New Zealand ODI schedule
  • पहिली वन डे - ११ जानेवारी, वडोदरा ( वेळ- १.३० वा.)

  • दुसरी वन डे - १४ जानेवारी, राजकोट ( वेळ- १.३० वा.)

  • तिसरी वन डे - १८ जानेवारी, इंदूर ( वेळ- १.३० वा.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.