Candidate Locked at Home : मनपा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वी नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा बघायला मिळतो आहे. येथे अपक्ष उमेदवाराला नागरिकांची घरात कोंडून ठेवलं आहे. त्यांनी अर्ज माघारी घेऊ नये म्हणून त्यांना घरात कोंडून ठेवल्याची माहिती आहे. किसन गावंडे असं या उमेदवारांचं नाव आहे. लोकांनी त्यांना घरात बंद केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे आमदार परिणय फुकेदेखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपने किसन गावंडे यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, त्यांचा फॉर्म रद्द झाला होता. त्यानंतर किसन गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता तो अर्ज मागे घ्यावा असे भाजपाकडून त्यांना सांगण्यात आलं.विशेष म्हणजे त्यासाठी ते तयारही झाले. मात्र,त्यापूर्वी नागरिकांनी त्यांना घरातच बंद केलं आहे. तसेच बाहेरून कुलूप लावलं.
Nagpur News: शासकीय आयुर्वेद कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंग?; विद्यार्थी बेडूक उडी मारतांनाचा व्हिडिओ व्हायरल..या गोंधळानंतर आता आमदार परिणय फुके या ठिकाणी दाखल झाले असून ते नागरिकांची समजूत काढत आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, हा मोठा प्रभाग आहे. जवळपास ५० बूथ आहे. त्यामुळे प्रतिनिधीत्व मिळणार आहे. मी प्रभाग क्र. १३ च्या नागरिकांना आश्वस्त करतो की त्यांचे कोणतेही काम राहणार नाही. आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढतो आहे. किसन गावंडे देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तयार आहे असंही त्यांनी सांगितलं.
Nagpur News:'भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अभिवादन सोहळा'; महार रेजिमेंटचे १५० निवृत्त सैनिक होणार सहभागी !दरम्यान, महापालिकेच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे. भाजपच्या नेत्यांकडे बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरमध्ये एकूण सहा प्रभागांतील एका जागेवर भाजपने दोघांना एबी फॉर्म दिला आहे. याशिवाय अनेक बंडखोरांनी रिंगणात उडी घेतली आहे. बाहेरच्यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.