मुस्लिम राष्ट्राने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना दिली मोठी धमकी, जगात खळबळ, म्हटले, विनाश तर..
Tv9 Marathi January 03, 2026 12:45 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. इराणमध्ये सध्या खामेनी सरकारविरुद्ध मोठं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न केली जात आहेत. यादरम्यान काही लोकांचा मृत्यू झाला असून सरकारकडून या आंदोलनावर गोळीबार करण्यात आला. इराणमधील स्थिती अधिक गंभीर असल्याचे अमेरिकेने म्हटले. फक्त हेच नाही तर आंदोलन चिघळताना दिसत असतानाच अमेरिकेने सरकारला मोठा इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबारात सहा आंदोलकांचा जीव गेल्यानंतर म्हटले की, आंदोलनात लोक मारली जात असतील तर अशा लोकांच्या मदतीला अमेरिका येईल. मात्र, आता अमेरिकेचे हे विधान खामेनी सरकारला अजिबातच पटल्याचे दिसत नसून इराणमधील आंदोलनात अमेरिकेने ढवळाढवळ करू नये, अन्यथा वाईट परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील असे म्हणत थेट मोठा इशाराच देण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या चेतावणीनंतर इराणने मोठी धमकी देत म्हटले की, इराणमधील आंदोलनात जर डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली तर सर्वकाही बर्बाद होईल. इराणच्या सुप्रीम लीडर अली खामेनेईच्या वरिष्ठ सल्लागाराने प्रतिक्रिया जारी केली. खामनेई यांचे सल्लागार शमखानी यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटले की, इराणी लोकांना अमेरिकेचे मदतकार्य चांगल्याप्रकारे माहिती आहे. इराणपासून अफगाणिस्तान आणि गाझाला देखील चांगल्याप्रकारे माहिती आहे.

कोणत्याही कारणाने इराणच्या सुरक्षेत हस्तक्षेप करणाऱ्याचे हात कापले जातील आणि त्याचे उत्तरही भयानक असेल. इराणची राष्ट्रीय सुरक्षा लाल रेष आहे, हा काही मनोरंजनाची विषय नाहीये. डोनाल्ड ट्रम्प इराणच्या आंदोलनाबाबत थेट भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, याला थेट इशारा आणि धमकी देत इराण सरकारने विरोध केला. अजिबात हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला आणि त्यांच्याविरुद्ध हिंसाचार केला तर मग अमेरिका त्यांच्या मदतीला नक्की येईल, अशी सोशल मीडिया पोस्ट थेट ट्रम्प यांनी केला. ज्याला आता इराणच्या सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली. इराणच्या सरकारला कोणाचाही हस्तक्षेप त्यांच्या देशात मान्य नाही. इराणने दिलेल्या तिखट प्रतिक्रियेनंतर डोनाल्ड ट्रम्प नक्की काय भाष्य करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.