राज्यासह देशात वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. कधी कडाक्याची थंडी तर मध्येच मुसळधार पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2026 ला मुसळधार पाऊस झाला. मागील काही दिवस राजयात कडाक्याची थंडी होती. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. उत्तरेकडे कडाक्याचा थंडीचा इशारा देण्यात आला. उत्तरेकडून राज्यात शीत लहरी येत असल्याने काही भागात थंडी कायम राहणार आहे. मागील काही दिवसांपासून उत्तरेकडे दाट धुक्यांमुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये अजूनही पाऊस आहे. जम्मू काश्मीरच्या काही भागातही पाऊस झाला. जानेवारी महिन्याला सुरूवात झाली असून देशातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील काही भागात आजही हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.
शनिवारी पहाटेच्या वेळी नोएडापासून वाराणसीपर्यंतच्या प्रदेशात धुक्याची दाट चादर पसरलेली असेल. हवामान विभागाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यांसाठी धुक्याबाबत ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडून पुढील काही दिवसात पारा घसरताना दिसेल. त्याचा थेट परिणाम राज्यातील थंडीवर होईल. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
आज राज्यभरात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज हलका ते मध्यम अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. फक्त पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात वारेही सुटेल. पाऊस येणार असला तरीही राज्यात थंडी कायम राहणार आहे. सकाळी तापमानात मोठी घट होईल. सध्या वायू प्रदूषणही मोठा मुद्दा राज्यात निर्माण झाला.
मुंबई आणि दिल्लीमध्ये वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनत चालला आहे. मुंबईमध्ये काल हवा घातक होती. सायंकाळच्या वेळी आकाशात मोठ्या प्रमाणात धुके दिसत होते. कोर्टाने वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे महापालिकेला अगोदरच फटकारे आहे. मात्र, कारवाई सत्र शहरात सुरू असूनही अजूनही प्रदूषण काही कमी होत नाहीये. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
पुढील 5 दिवसांत हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, पुढील सात दिवसांत हिमाचल प्रदेश, बिहार, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यातील थंडीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार हे स्पष्टच आहे.