निवडणुकीच्या धामधुमीत मोठं आक्रीत, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा कुणावर आरोप?
Tv9 Marathi January 07, 2026 08:45 PM

Chhatrapati Sambhajinagar: निवडणुकीच्या धामधुमीत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आक्रीत घडलं आहे. प्रचाराला वेग आलेला असतानाच छत्रपती संभाजी नगर मध्ये दादाच्या राष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभाग क्रमांक 16 मधील कैलास नगर मधील कार्यालय अज्ञात व्यक्तीकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. राष्ट्रवादीकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून असे प्रकार घडत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

आज भल्यापहाटे घडला प्रकार

आज भल्या पहाटे 4=5 वाजेदरम्यान हा प्रकार घडला. एक लाल टीशर्ट घातलेला इसम या ठिकाणी आला. त्याने कार्यालयाबाहेरील पडद्याला आग लावली. त्यानंतर त्यानं सिगारेट शिलगावात आरामात तिथून पळ काढला. दरम्यान या ठिकाणी आग लागली होती. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांना उठवलं आणि आग लागल्याची माहिती दिली. जातीपातीच्या राजकारणाला आम्ही थारा देत नाही. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही उपलब्ध करून देत पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवल्याचे ष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख म्हणाले.

आग लावणारा कोण?

दरम्यान याप्रकरणात उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकाराचा निषेध केला. सीसीटीव्ही फुटेज वरून संपूर्ण चौकशी पोलीस प्रशासन करेल.चौकशीत जो कोणी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.आज आम्हाला नक्की सांगता येत नाही तो पण कोणत्या पक्षाचा आहे.आमच्या चारही उमेदवारांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे समोरच्या पार्टीकडे राहिले नाहीत. याची संपूर्ण चौकशी पोलीस कमिशनर करतील, जो कोणी असेल कोणत्याही पक्षाचा असेल, तो भाजपाचा असेल सेनेचा असेलराष्ट्रवादीचा असेल त्याच्यावर कारवाई होईल.आमच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे सुरू आहे. मात्र आमच्या कार्यकर्ते अजून जोमाने कामाला लागतील, असे दानवे म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.