टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण संघात समाविष्ट असलेला टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल की नाही हे देखील सांगता येत नाही. (Photo- PTI)
विजय हजारे ट्रॉफीत दुखापत जाणवल्याने तिलक वर्मावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार त्याला बरे होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागू शकतात. जर असे झाले तर 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणे त्याच्यासाठी कठीण होईल. (Photo- PTI)
तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळला नाही तर त्याच्या जागा कोण घेणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण या शर्यतीत श्रेयस अय्यर आघाडीवर आहे. अय्यर तिसऱ्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अय्यरने 47 टी20 सामन्यांमध्ये 30.66 च्या सरासरीने आणि 136 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 1104 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा*, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित सिंह, हर्षित सिंह, आर. (Photo- PTI)