रात्री उशीरा जेवल्याने काय त्रास होतो, डॉक्टरांनी दिली उपयुक्त माहिती
GH News January 09, 2026 07:12 PM

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्री उशीरा जेवणे आणि उशीरा जेवणे हे सार्वत्रिक बनले आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजार जडतात,अनेक लोक रात्रीच्या वेळी जेवतात त्यामुळे उशीराच जेवतात. त्यामुळे हळूहळू त्याचा शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. ज्याचा लागलीच नाही परंतू उशीराने का होईना प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. रात्री उशीरा जेवल्याने शरीराचे संतुलन बिघडते आणि ब्लडशुगर सारखी समस्येचा धोका वाढू लागतो.याचा परिणाम डायबिटीजपर्यंतच मर्यादित राहत नाही तर सर्वसामान्यातही शुगरची लेव्हल प्रभावित होऊ शकते. यासाठी रात्री उशीरा जेवण्याच्या सवयीला हलक्यात घेऊ नये…

रात्री उशीरा जेवणे आणि ब्लड शुगर यात मोठे नाते दिसून आले आहे. अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की यामुळे साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. याचे मुळ कारण या सवयीबाबत विशेष सर्तक रहाण्याचा सल्ला दिला जाते. चला तर पाहूयात रात्री उशीरा जेवल्याने शुगर लेव्हलवर काय परिणाम होतो. असे रात्रीच्या वेळी खाल्लेले जेवण रात्री लागलीच ऊर्जेत रुपांतरीत होऊ शकत नाही असे आरएमएल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुभाष गिरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते.

रात्री उशीरा जेवल्याने कशी वाढू शकते शुगर लेव्हल?

जर एखादी व्यक्ती रात्री उशीरा जेवत असेल तर त्यांच्या शरीराचा संतुलन योग्य प्रकारे करण्यास अडचण होऊ शकते. रात्रीच्या वेळी शरीराचे कामकाज दिवसाच्या तुलनेत हळूवार होत असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

खासकरुन जास्त गोड खाल्ल्याने शुगरची पातळी वेगाने वरती जाते. अनेकदा याचा परिणाम सकाळीच्या फास्टींग शुगरवर देखील पाहायला मिळतो. सातत्याने रात्री उशीरा जेवल्याने तुमच्या शरीराची नैसर्गिक दिनचर्या बिघडू शकते.ज्यामुळे साखरेचे नियंत्रण राखणे कठीण होते. याच कारणामुळे डॉक्टर रात्रीचे उशीरा जेवण्यास नकार देत असतात.आणि झोपण्याआधी किमान दोन तास आधी तरी जेवावे.

सामान्य लोकांसाठी देखील धोका

नेहमची लोक असा विचार करतात की शुगर वाढण्याची समस्या केवळ डायबिटीज रुग्णांसाठीच असते., परंतू असे बिलकुल नाही. जे लोक संपूर्णत: आरोग्यदायी आहेत त्यांच्या देखील रात्री जेवल्याची सवय भविष्यातील समस्येचे कारण बनू शकते. बराच काळ असे केल्याने शरीरातील शुगर कंट्रोल सिस्टीम कमजोर होऊ शकते.

हळूहळू इन्सुलिनवर याचा परिणाम होत असतो. आणि ब्ड शुगर सामान्य पातळीपेक्षा वर जाऊ लागते. अनेक प्रकरणात ही सवय पुढे जाऊन डायबिटीजचा वाढवू शकते. यासाठी सामान्य लोकांसाठी देखील वेळेवर जेवणे आणि सुंतलित आहार घेणे तेवढेच गरजेचे असते.

शुगर कंट्रोल कशी करायची ?

रात्रीचे जेवण झोपण्याआधी किमान २ ते ३ तास आधी खावे

हलके आणि संतुलिक अन्नाची निवड करावी

रात्री उशीरा गोड आणि तळलेले तिखट खाणे टाळावे

रोज थोडी शारीरिक एक्टिव्हीटी करावी

रोज खाण्याची आणि झोपण्याची वेळ फिक्स ठेवा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.