Tejal Pawar : 'मिसेस आहेत सोबत, तुम्ही काय करताय..' विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर तेजल पवार यांचा गंभीर आरोप
Tv9 Marathi January 07, 2026 08:45 PM

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी माझ्यावर राहुल नार्वेकर यांनी दबाव टाकला, असा गंभीर आरोप तेजल पवार यांनी केला आहे. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. तेजल पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांच्यावर हे आरोप केलेत. “तिला समाजसेवेची ओढ आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये ती नोकरीला होती. तिला लोकसेवा करायची आहे. तू माझ्या विरोधात फॉर्म कसा भरु शकतो. कोणातरी तुला शिकवलं असेल. मला माहित नाही. 16 तारखेनंतर 17 तारीख येते. मी काहीच बोललो नाही. इतक्या लोकांसमोर काय बोलू मी. मी चूपचाप निघून गेलो” असं आरोप तेजल पवार यांच्या पतीने केला. “मी घरी आलो. त्यांचे पीए आहेत, आम्हाला वारंवार फोन करायला लागले. मी फोन उचलला नाही. मी माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, म्हणून बॉम्ब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो” असे तेजल पवारचे पती म्हणाले.

“31 तारखेला सकाळी पीएचा फोन चालू झाला. मी फोनच उचलला नाही कोणाचा. 11 वाजता आत गेलो. 226 प्रभाग क्रमांकातून पाच जण होते. दोन अपात्र ठरले, तीन पात्र ठरले. माझी मिसेस. एक मकरंद नार्वेकर होते आणि एक अपक्ष होता. त्याला फॉर्म भरायला मीच मदत केलेली. मी त्याला शुभेच्छा दिल्या. तुमची निशाणी हत्ती आहे. त्याला विजयाच्या शुभेच्छा देऊन बाहेर निघालो” असं तेजल पवार यांचे पती म्हणाले.

‘मला घेराव घातला’

“त्यांचे पीए आलेले. बोलता-बोलता रिचर्ड क्रूड मिलच्या बाहेर आलो. राहुल सरांना भेट बोलले. मी म्हटलं तीन-चार दिवस झोपलो नाहीय नंतर भेटतो. फुल फोर्स केला चल चल. दुसऱ्याने खांद्यावर हात ठेवला. मिसेस आहेत सोबत, तुम्ही काय करताय मी म्हटलं तर त्याने आपण कुलाब्याचे आहोत असं त्याने सांगितलं. मी गाडीत नाही बसणार बोललो. माझ्याकडे बाईक आहे. बॉडीगार्ड खाली उतरले. मला घेराव घातला” असा आरोप तेजल पवार यांच्या पतीने केला.

‘मी तुझी लाईफ सेट करतो असं बोलले’

“पहिलं माझ्याशी प्रेमळपणे बोलले. तुला काय पाहिजे? तुला हवं ते कॉन्ट्रॅक्ट घे.पहिली माघार घे. तो अपक्ष माघार घेणार हे तेव्हा मला माहित नव्हतं. मला तो पर्यंत त्यांचा हेतू माहिती नव्हता. गाडीत प्रेमळपणे बोलले. मी तुझी लाईफ सेट करतो असं बोलले” असे आरोप तेजल पवार यांच्या पतीने केले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.